Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कागदपत्रांच्या तपासणीसाठी व्यापाऱ्याची गाडी अडवली, 1.25 कोटींचं सोनं घेऊन फरार, पोलीस हवालदारासह चौघांना बेड्या

मुंबई पोलिसांनी एका सोने व्यापाऱ्याकडून जवळपास अडीच किलो सोने लुटून पसार झालेल्या चार आरोपीना अटक केली आहे.

कागदपत्रांच्या तपासणीसाठी व्यापाऱ्याची गाडी अडवली, 1.25 कोटींचं सोनं घेऊन फरार, पोलीस हवालदारासह चौघांना बेड्या
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 5:27 PM

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबई पोलिसांनी एका सोने व्यापाऱ्याकडून जवळपास अडीच किलो सोने लुटून पसार झालेल्या चार आरोपीना अटक केली आहे. विशेष बाब अशी आहे कि या चार अटक आरोपींपैकी एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. सदर व्यापाऱ्याला धमकी देऊन पोलीस चौकशी करण्याच्या नावाखाली 1 कोटी 25 लाख रुपये किंमतीचं सोनं लुटण्यात आलं होतं. (Merchant’s vehicle blocked for documents, absconding with gold worth Rs 1.25 crore, four arrested along with police constable)

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 31 मे 2021 रोजी संध्याकाळी तक्रारदार भरत कुंदनलाल जैन हे आपला सहकारी मितेश कांबळेसोबत मोटरसायकलने जात होते. मात्र जेव्हा ते पोलीस कॉलोनी, दादोजी कोंडदेव मार्ग भायखळा येथे पोहोचले, तिथे त्यांची बाईक अडवण्यात आली. तीन आरोपी ज्यात एक माणूस पोलीस वर्दीत होता त्यांनी तक्रारदार जैन यांना अडवून त्यांच्याकडे असलेली काळ्या रंगाची बॅग घेतली. तुमच्या कागदपत्रांची पोलीस चौकशी करायची आहे, असे कारण देऊन बॅग ताब्यात घेतली आणि लबाडीने त्यांच्याकडील 2448 ग्रॅम (जवळपास 1 कोटी 25 लाखांचे सोने घेऊन पळून गेले.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने लागला शोध

तक्रारदार जैन यांनी सदर घटनेबाबत पोलिसात तक्रार केली. त्यानंतर गुन्हे शाखेने यावर त्वरित कार्रवाई सुरू केली. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून तीन आरोपीना अटक केली आणि त्यांच्या चौकशीदरम्यान असं समोर आलं की या आरोपीने सदर सोने एका व्यक्तीकडे ठेवले होते. त्या अनुषंगाने चौथ्या आरोपीला म्हणजे एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

लुटीमध्ये पोलीस सहभागी!

आश्चर्याची बाब म्हणजे, अटक आरोपी पैकी एक आरोपी जो घटनेच्या वेळी पोलीस वर्दीत होता तो मुंबईच्या एल ए विभागात कान्स्टेबल म्हणून कार्यरत होता. त्याचबरोब्र या गुन्ह्यात इतर तीन आरोपी रवींद्र कुंचिकोरवे, संतोष नाकटे आणि महेश जाधव हे तिघेही शिवडी आणि जवळपासच्या भागात राहणारे आहेत. दरम्यान, या चौघांनी अजून अशी लुटमार केली आहे का, याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

गुन्हे शाखेने अटक आरोपींकडून 1045 ग्रॅम सोने ज्याची किम्मत 52,06,689 रुपये इतकी आहे, घटनेत वापरण्यात आलेल्या 2 मोटारसायकली ज्यांची किंमत 60,000 रुपये आणि 4 मोबाईल जप्त केले आहेत. सर्व मुद्देमालाची किंमत 52,74,689 रुपये इतकी आहे. मात्र या घटनेत अजूनही काही सोने जप्त करणे अजून बाकी आहे. त्याचबरोबर आणखी काही आरोपींना अटक होण्याची दाट शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास भायखळा पोलीस करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

इतर बातम्या

‘माझ्या भाच्याला काही बोलू नको’, बापाचा संतापाचा पारा चढला, थेट मेव्हण्यावर वार, गोंदिया हादरलं!

शारीरिक संबंधाचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात सहा जणांकडून गँगरेप

‘तो’ हॉटेलमध्ये शिरला, पत्नीला परपुरुषासोबत एका खोलीत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर….

(Merchant’s vehicle blocked for documents, absconding with gold worth Rs 1.25 crore, four arrested along with police constable)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.