मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तीन नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबते, अडीच तासाच्या बैठकीत असे झाले निर्णय

vidhan sabha election 2024: वर्षा बंगल्यावरील बैठक गुरुवारी रात्री ११ ते १.३० पर्यंत सुरु होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे. मेळावे, सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघावर लक्ष ठेऊन रणनीती तयार केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर तीन नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबते, अडीच तासाच्या बैठकीत असे झाले निर्णय
वर्षा बंगल्यावर महायुतीची झालेली बैठक.
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 7:41 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली दौरा केला. त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आला. त्यानंतर मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाची बैठक झाली. सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रणनीती निश्चित करण्यात आली. तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथून फुंकण्यात येणार आहे.

तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा

वर्षा बंगल्यावरील बैठक गुरुवारी रात्री ११ ते १.३० पर्यंत सुरु होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे. मेळावे, सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघावर लक्ष ठेऊन रणनीती तयार केली जाणार आहे. येत्या २० तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

७ विभागात सभा होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री ११ वाजता पोहचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. या बैठकीत ७ विभाग आणि २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला. तसेच ७ विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. २० ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथून जाहीर सभेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकंले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होता. या निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला होता. महाविकास आघाडीने ३० जागा आणि महाविकास आघाडीतील बंडखोर अशा ३१ जागांवर वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे आता महायुतीने अधिक जोराने काम सुरु केले आहे.

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.