अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (minister Anil Parab asked me to extort money claims Sachin Vaze in his letter to NIA)

अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण
anil parab
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 7:20 PM

मुंबई: निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनीही आपल्याला वसूली करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट वाझे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाझेंनी केलेल्या या आरोपांमुळेच अनिल परब यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दोन मुलींची शपथ घेण्याची वेळ आली आहे. परब यांनी वाझे यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत. (minister Anil Parab asked me to extort money claims Sachin Vaze in his letter to NIA)

सचिन वाझे यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी हे पत्रं एनआयए कोर्टाला दिलं असून त्यात अनेक गंभीर आरोप केले आहेत. या चार पानी पत्रात परब यांच्यासह सरकारमधील दोन मंत्र्यांवरही आरोप केले आहेत. अनिल परब यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलावून मुंबई महापालिकेच्या 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.

एसबीयूटीकडून वसुलीचे आदेश

परब यांनी मला जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मला बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता, असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांना कल्पना दिली होती

त्यानंतर परब यांनी जानेवारी 2021मध्ये पुन्हा मला बोलावून घेतलं. मुंबई पालिकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. त्यांनी मला 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी कमीत कमी दोन कोटी रुपये वसूल करायला सांगितलं, असा दावा वाझेंनी केला आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी मला वसुली करायला सांगितल्याबद्द्ल मी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सांगितलं होतं. त्यावर सिंग यांनी या मागण्या मान्य करू नका म्हणून सांगितलं होतं, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.

काय म्हणाले परब?

दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून त्यांना माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं, असं सांगतानाच मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं परब यांनी स्पष्ट केलं. (minister Anil Parab asked me to extort money claims Sachin Vaze in his letter to NIA)

संबंधित बातम्या:

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब

EXCLUSIVE : अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले, सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, मविआच्या 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी, एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून खुलासा

(minister Anil Parab asked me to extort money claims Sachin Vaze in his letter to NIA)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.