कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तब्येतीची विचारपूस

महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तब्येतीची विचारपूस
मंत्री धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 3:54 PM

राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना अनेक दिवसांपासून पित्त आणि पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आता पोटदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर (gall bladder) डॉ. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना 24 जुलैला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर 26 जुलैला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती आणि पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तब्येतीची विचारपूस

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.