महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळजनक बातमी, दहशतवाद्यांचा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा घातपात घडवण्याचा होता डाव?

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. दहशतवाद्यांकडून सुधीर मुनगंटीवार तसेच इतर नेत्यांनादेखील धमकीचे फोन येत आहेत. तसेच आपल्यासोबत घातपात घडवण्याचा मोठा कट देखील आखण्यात आला होता, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळजनक बातमी, दहशतवाद्यांचा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा घातपात घडवण्याचा होता डाव?
sudhir mungantiwarImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 4:56 PM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. याशिवाय पुण्यातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. त्यानंतर आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. असं असताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जीवे मारण्याचा धमकीचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशोमती ठाकूर यांना संरक्षण पुरवण्याचं आश्वासन दिलं. या विषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. काही विकृत आणि समाजकंटकांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत घातपात घडवण्याचा कट होता, असा मोठा दावा मुनगंटीवार यांनी केला.

“आम्हाला पण धमकी मिळते. पण आम्ही मग काही मीडियाला सांगत नाही. आम्ही पोलिसांकडे जातो. तो विषय पोलिसांचा आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना धमकी दिली जाते. पण आम्ही कधी मीडियात जात नाहीत”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘माझ्या गाडीचे सर्व नटबोल्ट काढले, अपघात घडवण्याचा कट होता’

“माझ्यापण गाडीचे नट बोल्ड लूज केले होते. अपघात घडवण्याचा कट होता. पण मी मीडियाकडे गेलो नाही. माझ्या गाडीचे सर्व नटबोल्ट काढले होते. मी कंपनीत विचारले तर ते म्हणाले, असं कधीच होऊ शकत नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“भाजपच्या अनेक नेत्यांना अशी धमकी येते. आता ATS ने पण सांगितले आहे की, सावध रहा. आम्हाला सूचना केल्या. कोणतीही लिंक आली की त्या ओपन करायची नाही. याची आम्हाला भीती नाही पण काळजी घ्यायला हवी. दहशतवाद विरोधी पथकाने सर्वांना सांगितले आहे. विरोधकांना पण सांगितले आहे”, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

‘आमच्यासोबत अजून काही जण येणार’

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झालीय. यावरही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “आमच्या विमानात अजून जागा आहे. सबका साथ सबका विकास. आमच्यासोबत अजून काही जण येणार आहेत. याआधी जे विरोधी पक्षनेते झाले ते विरोधी बाकावरुन सत्ताधारी बाकावर आले आहेत”, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं.

‘नितीन देसाई मनापासून काम करायचे’

“ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई मनापासून काम करायचे. देवाची अर्चना समजून काम करायचे. त्यांनी जी इच्छा व्यक्त केली, कुटुंबाची इच्छा जाणून घ्यावी लागेल. त्यांच्या परवानगीशिवाय एक पाऊल पुढे टाकू शकत नाही. परिवारातील सर्वांशी चर्चा करु. कायद्याने पुढे जाऊ. सरकार विचार करेल. त्यांची अंतिम इच्छा हीच आहे की एनडी स्टुडिओच्या जागेवर मॉल किंवा दुसरं काही होऊ नये”, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

“अजून सर्व माहिती घेतल्याशिवाय लगेच काही बोलू शकत नाही. सरकारने अजून काही विचार केला नाही. कायद्याच्या नजरेने अभ्यास करावा लागेल”, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.