MLC Election : शिवसेनेचा वर्धापन दिन फाईव्ह स्टारमध्येच साजरा होणार, मुख्यमंत्री काय बोलणार? संजय राऊत म्हणतात आम्ही…

शिवसेनेचा वर्धापन दिन हा उद्या वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होईल. तसेच मुख्यमंत्री हे प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती काही वेळापूर्वीच हॉटेल वेस्टीनमधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

MLC Election : शिवसेनेचा वर्धापन दिन फाईव्ह स्टारमध्येच साजरा होणार, मुख्यमंत्री काय बोलणार? संजय राऊत म्हणतात आम्ही...
शिवसेनेचा वर्धापन दिन फाईव्ह स्टारमध्येच साजरा होणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:22 PM

मुंबई : एकिकडे शिवसेनेचा वर्धापन (Shivsena Wardhapan Din) दिन उद्यावर आला आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Eleciton) रणधुमाळी सुरू आहे. अशात शिवसेनेचा (वर्धापन दिन कसा आणि कुठे? साजरा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता याबाबतही स्पष्टता आली आहे. सुरूवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधण्याची तयारी केली होती. मात्र शिवसेनेचे सर्व आमदारच मुंबईतील पवईत वेस्टीनमध्ये असल्याने शिवसेनेने आपल्या प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे. कारण शिवसेनेचा वर्धापन दिन हा उद्या वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होईल. तसेच मुख्यमंत्री हे प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती काही वेळापूर्वीच हॉटेल वेस्टीनमधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार सध्या याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना खासदार संजय राऊत हे हॉटेल वेस्टीनमधूनच बोलत होते, ते म्हणाले, याच हॉटेलमध्ये उद्या प्रत्यक्ष वर्धापन दिन साजला होईल. मुख्यमंत्री उद्या सकाळी वेस्टीनमध्ये येतील आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करतील. संपूर्ण देशाचं लक्ष हे मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे.. शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापनदिन सोहळ्याला राजकीय महत्व हे नेहमी असते. प्रत्येक वर्धापण दिन हा महाराष्ट्राला दिशा देत असतो, ज्या पद्धतीन महाराष्ट्रावर आक्रमण सुरू आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष, लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊतांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या राजकीय नाट्यावर मुख्यमंत्री उद्या कसा प्रहार करणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सर्वांनी आपली व्यवस्था केली आहे

तसेच शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षांत अंतर्गत मतभेद नसतात. तर गावकडील आमदरांना याठिकाणी कधी राहायला मिळणार? ही एक व्यवस्था असते, महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे. आमदरांना मार्गदर्शन करता यावं यासाठी याठिकाणी ठेवण्यात आलं आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत अनेक तांत्रिक बाबी असतात, त्या गोष्टी शिवसेना नेते आमदरांना याठिकाणी समजावून सांगत आहेत, अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली आहे. तर  प्रत्येकाने आपला प्लॅन ठरवला आहे, मात्र महाविकास आघाडी एकत्र आहे आमचा कोटा आम्ही तुम्हाला का सांगू, सोमरच्यांचा कोटा आम्हाला सांगा, सगळ्यांना अपक्षांची गरज असते, सर्वांनी आपआपली व्यवस्था केली आहे, असे सूचक विधानही यावेळी संजय राऊतांनी केले आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....