राज ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाले?
"एकनाथ शिंदे दानशूर माणूस आहे. सत्तेतील माणूस दानशूर पाहिजे. सत्तेतील माणसाचे दोन्ही हात मोकळे पाहिजे. मी त्यांना भेटलो. त्यांनी पटापट निर्णय घेतले. बीडीडी चाळी वगैरे. पुण्यातील दोन मुलांचा शॉक लागून मृत्यू झाला. शिंदेंनी एका मिनिटात १० लाखाचा चेक दिला", असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेंचं कौतुक केलं.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. असं असताना एकनाथ शिंदे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत देताना एक प्रसंग सांगत कौतुक केलं. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळावलं यावरुन राज ठाकरे यांच्याकडून टीका केली जाते. पण त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतात त्याचं कौतुक राज ठाकरे यांनी केलं.
“एकनाथ शिंदे दानशूर माणूस आहे. सत्तेतील माणूस दानशूर पाहिजे. सत्तेतील माणसाचे दोन्ही हात मोकळे पाहिजे. मी त्यांना भेटलो. त्यांनी पटापट निर्णय घेतले. बीडीडी चाळी वगैरे. पुण्यातील दोन मुलांचा शॉक लागून मृत्यू झाला. शिंदेंनी एका मिनिटात १० लाखाचा चेक दिला. काँग्रेसचा मुख्यमंत्री असता तर त्याने करू म्हटलं असतं”, असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. “माझ्याबाबत नीट विचार करा. जनरल राजकारण्यांसारखा माझा तुम्ही विचार करता. मी तसा नाही. मला राजकारणी नाही आहे असं म्हटलं तरी चालेल”, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?
“लाडकी बहीण योजना टिकली दर महिन्याला टिकवता आलं तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला ब्राईब म्हणेल. मला इतर राजकारण्यांसारखं नाही वागता येणार. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणार. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. याचा अर्थ भूमिका बदलत आहात असं होत नाही. ,स्वार्थासाठी केलं तर ती गोष्ट लागू होते. तुमचा स्वार्थ नसेल एखादी भूमिका पटली तर तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे”, असं राज ठाकरे स्पष्ट म्हटलं.
“मुलगा उत्तम रितीने पास झाला तर कौतुक करता. नापास झाला तर ओरडता. मग त्याला घरातून हाकलून देता का. माझ्याबाबत काही गोष्टी समजून घ्या. बाकीच्यांच्या तराजूत मला तोलू नका”, असं राज ठाकरे म्हणाले.