पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, बाकीचे लोक बघ्याच्या…

पुण्यात दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयता घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत. मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक केले आहे.

पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, बाकीचे लोक बघ्याच्या...
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 11:45 AM

मुंबई : पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच काल एक धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात येत होता. पण लेशपाल जवळगे या तरुणाने जीव धोक्यात घालून या तरुणीला वाचवलं. त्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले. त्यामुळे लेशपालचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचं कौतुक होत असतानाच मनसे अध्यक्षङ राज ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरे यांनी बघ्यांना आणि राज्य सरकारलाही फटकारले आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांनी ट्विट करत कालच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित. पण यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाही ना?

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, असा राज्य सरकारला टोला लगावतानाच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा. आणि वेळीच धावून जा, असं आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले.

काय घडलं नेमकं?

पुण्यातील सदाशिव पेठेत पेरू गेट पोलीस चौकीच्या जवळच काल सकाळी एक तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना आरोपीने ही गाडी अडवली. तसेच तरुणीच्या जवळ येऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू बोलत का नाहीस? असा सवाल त्याने केला. या तरुणीने आरोपीशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाचा राग अनावर झाला आणि त्याने बॅगेतून आणलेला कोयता बाहेर काढून थेट तरुणीवर उगारला. त्यामुळे ही तरुणी भयभीत झाली आणि जीव वाचवण्यासाठी ती सैरावैरा धावू लागली. या ठिकाणी असंख्य लोक होते. पण तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

लेशपालने मात्र जीव धोक्यात घालून या तरुणीला वाचवले. आरोपीला गच्च पकडून त्याने बाजूलाच असलेल्या पेरू गेट पोलीस चौकीत गेला आणि आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दाखल झाला आहे. आता विश्राम बाग पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाकल केला आहे. आरोपीचे नाव शंतनु लक्ष्मण जाधव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.