मुंबईत झळकले ‘मनसे इॅम्पक्ट’चे बॅनर, राज ठाकरे यांच्या भाषणाच्या बारा तासांत झाली कारवाई पूर्ण

माहीम येथील दर्गाच्या पाठीमागे असलेल्या समुद्रातील अनधिकृत मजारच्या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. तसेच त्याचा व्हिडिओ दाखवलेला होता. याआधी ही मजार नव्हती, असा दावा केला होता.

मुंबईत झळकले 'मनसे इॅम्पक्ट'चे बॅनर, राज ठाकरे यांच्या भाषणाच्या बारा तासांत झाली कारवाई पूर्ण
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:30 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा झाली. या सभेचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. त्यांनी भाषणा दरम्यान व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या भाषणानंतर लागलीच ते बांधकाम पाडण्याचे आदेश निघाले अन् दुसऱ्या दिवशी सकाळी बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर सांगलीतही कारवाई झाली. मनसेच्या या यशानंतर मुंबईत इॅम्पक्टचे बॅनर झळकले आहे. अगदी दादर येथील शिवसेना भवनासमोरही हे बॅनर लावले आहे. दरम्यान मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कारवाई केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

काय लावले बॅनर

हे सुद्धा वाचा

माहीम येथील दर्गा च्या पाठीमागे असलेल्या समुद्रातील अनधिकृत मजारच्या संदर्भात काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये उल्लेख करत व्हिडिओ दाखवलेला होता.  जर या मजारवर कारवाई झाली नाही तर पुढील एका महिन्यामध्ये मनसैनिक याच अनधिकृत बांधकामाच्या बाजूला मोठं गणपती मंदिर उभारणार असा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानंतर प्रशासनाने 12 तासाच्या आत तात्काळ या अनधिकृत मजारवर कारवाई केलेली आहे या संदर्भात मनसेचा इम्पॅक्ट या आशयाखाली मनसैनिकांकडून शिवसेना भवनाच्या समोर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.

काय म्हणतात नितीन सरदेसाई

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, तातडीने कारवाई केली त्याबद्दल प्रशासनाचे मी अभिनंदन करतोय. मात्र यापुढे या पद्धतीने अनधिकृत बांधकाम होतं असेल, तसेच धार्मिक स्थळांच्या नावाखाली चुकीच्या ठिकाणी वापर होतं असेल त्याच्यावर कारवाई होतं राहिली पाहिजे. तिथं पुन्हा कोण बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ही प्रतिबंध केला पाहिजे. प्रशासनाने नेहमी सतर्क राहील पाहिजे. माहीम मधील प्रकरण म्हणजे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं किंवा डोळेझाक झाली, हा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी मुद्दा घेतला आणि त्यानंतर हे झालं त्याबद्दल मी त्यांचं ही अभिनंदन करायला हवे.

हेच दुर्देव नाही का

जनतेच्या मनातले मुद्दे राजकीय पक्षांना घ्यावे लागते हे दुर्दैव आहे. प्रशासन आणि सरकारची ही परिस्थिती असेल तर काय होणार? असा सवाल नितीन सरदेसाई यांनी उपस्थित केला. त्या ठिकाणी आम्ही जाणार होतो, परंतु त्यापूर्वी प्रशासनाने ही कारवाई केली, नाहीतर काहीतर वेगळं दृश्य दिसलं असतं, असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.