राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नवरा-बायकोतही भांडणे सुरू; मनसेच्या बड्या नेत्याची खोचक टीका

उद्धव ठाकरेंच्या सेनेला अंधारेबाई पुढे घेऊन जात आहे. आता या म्हशीच्या स्वप्नात रेडा येतो. त्याला आम्ही काय करणार? मातोश्री कोणत्या पैशाच्या जोरावर उभी राहिली हे विचारा.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नवरा-बायकोतही भांडणे सुरू; मनसेच्या बड्या नेत्याची खोचक टीका
शरद पवार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 7:55 AM

मुंबई: राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून राज्यात जातीयवाद फोफावल्याचा दावा मनसे नेते राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीने उत्तरही दिलं आहे. स्वत: शरद पवार यांनीही राज ठाकरे यांचा हा आक्षेप खोडून काढला आहे. मात्र, हा आरोप होत असतानाच मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक नवं विधान केलं आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नवराबायकोतही भांडणं सुरू झाल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

मनसेने घे भरारी अभियान सुरू केलं आहे. या अभियानाला संबोधित करताना प्रकाश महाजन यांनी हे विधान केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष जेव्हा पासून सुरू झाला तेव्हा पासून जातीवाद सुरू झाला. नवरा बायकोत सुद्धा भांडण सुरू झाले. सत्तेचा चमचा घेऊन जन्मलेला हे लोक आहेत, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

हे सुद्धा वाचा

जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं राष्ट्रवादीने सुरू केलंय. संभाजी महाराज धर्मवीर नसल्याचं म्हणत आहेत. अरे तुला इतिहास माहीत आहे का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

बरं हा (राहुल गांधी) महाराष्ट्रात आल्यावर याच्या अंगात येते. सावरकरांना माफीवीर म्हणतो आणि ज्याचे आजोबा सावरकर यांचे भक्त होते तो त्याला भेटायला जातो, असा टोला महाजन यांनी लगावला.

यावेळी प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव साहेब बापाचे भांडवल घेऊन पुढे जात आहेत. बापाचं भांडवल घेऊन निघालेला पोरगा नतद्रष्ट निघाला. बाप पाळवण्याची टोळी आली अशा चर्चा सुरू झाल्या. काय त्या पक्षची अवस्था केली आहे, असं सांगतानाच ठाकरे सरकारने काय केले? कोरोनात घरी बसले, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या सेनेला अंधारेबाई पुढे घेऊन जात आहे. आता या म्हशीच्या स्वप्नात रेडा येतो. त्याला आम्ही काय करणार? मातोश्री कोणत्या पैशाच्या जोरावर उभी राहिली हे विचारा. या बाई आल्यामुळे त्यांचा पक्ष अंधाराकडे गेला आहे. निलम गोऱ्हे या चळवळीमधल्या आहेत, असंही ते म्हणाले. उद्धव साहेब या सुषमा अंधारेने तुमच्या वडिलांना 85 वर्षाचे म्हातारे म्हटले आणि ती तुमच्या सोबत?, असा सवालही त्यांनी केला.

हा समृद्धी महामार्ग म्हणजे राजहट्ट आहे. देवेंद्र यांनी नागपूरहुन मुंबईला यायला केलेला हा मार्ग म्हणजे राजहट्ट आहे. त्याचा टोल किती? यावरून सुद्धा आंदोलन करावे लागेल, असा इशाराच त्यांनी दिला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.