राजीव गांधींपासून नरेंद्र मोदींपर्यंत गंगा स्वच्छतेच्या नुसत्या गप्पाच…राज ठाकरे यांनी नद्या प्रदूषणचा विषय रोखठोक मांडला
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: राजीव गांधी ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधान म्हणतात, गंगा स्वच्छ करायची आहे. परंतु त्यातील पाणी पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती नद्यांची आहे. प्रश्न हा कुंभमेळा किंवा गंगेच्या अपमानाचा नाही. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा विषय आहे.

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी घेतलेल्या गुढी पाडवा मेळाव्यात नद्याच्या प्रदूषणाचा विषयाला हात घातला. देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी कुंभमेळाव्याबाबत काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.
मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, गेली काही दिवस काही घटना घडल्या त्या सांगणे आवश्यक आहे. कुंभमेळा या विषयावर बोलायचे आहे. आपण नद्यांना माता म्हणतो. देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था काय आहे? राजीव गांधी ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधान म्हणतात, गंगा स्वच्छ करायची आहे. परंतु त्यातील पाणी पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती नद्यांची आहे. प्रश्न हा कुंभमेळा किंवा गंगेच्या अपमानाचा नाही. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा विषय आहे. आतापर्यंत ३३ हजार कोटी रुपये खर्च झाले आहे. आता त्या महंतांना पाण्यात तसेच टाकून दिले. विधी आटपण्यासाठी एखादी जागा करता येत नाही का? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजे.
गंगा प्रदूषणाचा व्हिडिओ दाखवला
राज ठाकरे यांनी गंगा प्रदूषणाचा एक मिनिटांचा व्हिडिओ यावेळी दाखवला. त्या व्हिडिओत गंगेवर प्रेत जाळताना दिसत आहे. राख दिसत आहे. प्रेत नेली जात आहेत. गंगा नदीत दुषित पाणी सोडले जात आहे. कचरा टाकला जात आहे. जनावरे मेलेली दिसत आहे. प्रेत पाण्यात डुबवली जात आहेत. तसेच मुंबईतील नद्यांची परिस्थितीही दाखवली.




धर्मात सुधारणा झाल्या पाहिजे
राज ठाकरे म्हणाले, आपल्या गोष्टीत आपण सुधारणा नको करायला. काळ बदलला. लोकसंख्या वाढली. हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या वेगळ्या आहेत. हेच विधी आटोपण्यासाठी वेगळ्या घाटावर एखादी जागा करता येत नाही का. म्हणतात लोक ऐकत नाही. ऐकत कसे नाहीत. दारू पिऊन गाडी चालवल्यावर पोलीस पकडतात. हे कळल्यावर लोकं टॅक्सीत पिऊन जातात ना. झाली ना सुधारणा. आपल्या नद्या स्वच्छ राहिले पाहिजे. तिथले काही भाग इतके गलिच्छ आहे. आपणच या नद्या बरबाद करतोय. कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली. प्रत्येकाने आपल्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
महाकुंभात ६५ कोटी लोक येऊन गेल्याचा दावाबाबत राज ठाकरे म्हणाले. ६५ कोटी लोक म्हणजे अर्धा भारत. चला तर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सोडू. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती हीच आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात ३११ नदी पट्टे आहे. ते प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहे. महाराष्ट्रातील यातील ५५ नदी पट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित नद्या, सर्वात प्रदूषित उल्हास मिठी, उल्हास, पवना, भीमा,मुळा मुठा पवना गिरणा कुंडलिका, दारणा कान्हा तापी, इंद्रायणी निरा चंद्रभांगा वैनगंगा, वर्धा कृष्णा, या नद्या प्रदूषित आहे. भातसा, पैनगंगा या नद्यांच्या पात्रातील पाणी वाईट आहे. त्या नद्यांच्या तुलना. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातील चार नद्या मेल्या. पाचवी मिठी नदी मरायला आली, असे राज ठाकरे यांनी सांगितले.