Karnataka : राज ठाकरेंचं लोण कर्नाटकात पोहोचलं, मशिदीवरचे भोंगे बंद करण्याची भाजपच्या मंत्र्याची मागणी

कर्नाटकात (Karnataka) गेल्या महिन्या हिजाबचा वाद सुरु झाला होता. महाराष्ट्रात भाजपच्यावतीनं अजानसाठी लावण्यात आलेले भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं.

Karnataka : राज ठाकरेंचं लोण कर्नाटकात पोहोचलं, मशिदीवरचे भोंगे बंद करण्याची भाजपच्या मंत्र्याची मागणी
राज ठाकरे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:04 PM

मुंबई : कर्नाटकात (Karnataka) गेल्या महिन्या हिजाबचा वाद सुरु झाला होता. महाराष्ट्रात भाजपच्यावतीनं अजानसाठी लावण्यात आलेले भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवेल नाही तर मशिदीसमोर हनुनान चालीसा लावू अशी भूमिका घेतली आहे. आता कर्नाटकात मशिदीवरली भोंग्यांसर्भात भाजपचे मंत्री के.एस. ईश्वराप्पा यांनी भूमिका घेतली आहे. के.एस.ईश्वराप्पा हे कर्नाटक भाजपचे (BJP) प्रमुख नेते असून राज्यमंत्रिपदावर कार्यरत आहेत. मुस्लीम साजाला विश्वासात घेऊन या प्रश्नावरील मार्ग काढला जाऊ शकतो. प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकर लावण्याची परंपरा फार काळ सुरु ठेवता येणार नाही. त्यामुळं विद्यार्थी, लहान मुलं आणि रुग्णांना त्रास होतो, असं ते म्हणाले आहेत.

कर्नाटकचे राज्यमंत्री नेमकं काय म्हणाले ?

के एस ईश्वराप्पा यांनी हनुमान चालिसा मोठ्यानं लावणं ही स्पर्धा नाही. माझा मुस्लीम समाजाच्या प्रार्थनेवर आक्षेप नाही. मात्र, मंदिर आणि चर्चमध्येही लाऊडस्पीकरवर प्रार्थना सुरु केल्यास समाजामधील संघर्ष वाढू शकतो, असं ईश्वराप्पा म्हणाले. दुसरे मंत्री सी एन अश्वनाथ यांनी आमचं सरकार अजान संदर्भात नवीन कायदा आणणार नाही. सध्या कायद्यात असलेल्या नियमाप्रमाणं आम्ही काम करणार आहोत. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, असं ते म्हणाले.

बजरंग दल देखील आक्रमक

बजरंग दलाचे सदस्य भारत शेट्टी यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम राबवली. बंगळुरुच्या अजनेय मंदिरात त्यांनी मोहीम राबवली. श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी यांनी प्रशासनाकडे पहाटे 5 वाता लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरची दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलंय. आम्ही प्रार्थनेच्या विरोधात नसून लाऊडस्पीकर्सला आमचा विरोध असल्याचं ते म्हणाले. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही भजन वाजवू, असं ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल, असं म्हटलं होतं. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा, असं राज ठाकरे म्हणाले होते. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला. यानंतर मनसेच्यावतीनं मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक मध्ये हनुमान चालीसा लावण्यात आला होता.

इतर बातम्या:

MNS | राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्नचं नाही, साईनाथ बाबर यांनी चर्चा फेटाळल्या

Nashik | भोंगे आंदोलनाचं लोण नाशिकपर्यंत, कोणीही कायदा हातात घेऊ नका, डीजेसह लाऊड स्पीकर बंद करा : दीपक पांडेय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.