Sandeep Deshpande on Amol MItkari: मिटकरी म्हणजे मटणकरी, चड्डीत राहायचं काय समजलं?; मनसेची मिटकरींना दमबाजी
Sandeep Deshpande on Amol MItkari: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खाज ठाकरे म्हटलं. मिटकरी यांची ही टीका मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol MItkari) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना खाज ठाकरे म्हटलं. मिटकरी यांची ही टीका मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट मिटकरींवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून. ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?, अशी दमबाजीच संदीप देशपांडे यांनी केली आहे. देशपांडे यांनी ट्विट करून ही दमबाजी केली आहे. त्यामुळे देशपांडे यांच्या या टीकेला मिटकरी काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अमोल मिटकरी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीका करतानाच त्यांनी मनसेवरही जबरदस्त तोंडसुख घेतलं आहे.
काय म्हणाले होते मिटकरी?
मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या सभेवर टीका केली होती. मशिदी आणि भोंग्याचा मुद्दा आता काढण्याचे कारण काय? असा सवाल करतानाच राज ठाकरे हे खाज ठाकरे आहेत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. तसेच राज ठाकरे यांना फुले, आंबेडकर,शाहूंची अॅलर्जी आहे का? असा सवालही त्यांनी केला होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते.
राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2022
अमेय खोपकर यांची टीका
या मुद्द्यावरून अमेय खोपकर यांनीही मिटकरींवर नाव न घेता टीका केली होती. तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं ट्विटच खोपकर यांनी केलं होतं. खोपकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके द्यायला हवं, असं म्हटलं होतं. त्याला मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”, अशा शब्दात मिटकरींनी खोपकरांना प्रत्युत्तर दिलं होतं.
संबंधित बातम्या: