मनसे कार्यकर्त्यांची मोहीम, #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच आपणही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सरदार आहोत, असा निर्धार करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी (MNS party workers) सोशल मीडियावर हॅशटॅग मोहिम सुरु केली आहे.

मनसे कार्यकर्त्यांची मोहीम, #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 5:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रचंड प्रभावित झाल्याचे दिसत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी असा हॅशटॅग सुरु केला आहे (MNS party workers).

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच आपणही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सरदार आहोत, असा निर्धार करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी (MNS party workers) ही हॅशटॅगची मोहिम सुरु केली आहे.

येत्या २३ जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन आहे. या अधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. या अधिवेशनात मनसे हिंदुत्वाबाबत भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पक्षाच्या झेंड्याचा रंगदेखील बदलणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज ठाकरे अधिकृतपणे घोषणा करणार आहेत. त्यांच्या सर्व निर्णयांना कार्यकर्त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे या हॅशटॅग मोहिमेतून स्पष्ट होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील वीर सरदार तानाजी सावंत यांच्या आत्मचरित्रावर आधारीत ‘तान्हाजी’ चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या मावळ्यांनी जीवाची पर्वा केली नाही. तानाजी मालुसरे स्वत:च्या मुलाचे लग्न सोडून कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर गेले होते. त्यांनी स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकून दिला, पण यात त्यांना आपला जीव गमवावा लागला, अशी तान्हाजी मालुसरे यांची अमरगाथा आहे.

तीन दिवसांत ‘तान्हाजीं’ची घोडदौड

‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने तीन दिवसात 60 कोटींचा आकडा पार केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी तीनही दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. यानुसार तान्हाजी सिनेमाने तीन दिवसात मिळून तब्बल 61.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.