AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लेखोरांचा ठाण्यात मनसे स्टाईलने शोध

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी लक्ष्मी आणि चिराग नगरमध्ये राहत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लेखोरांचा ठाण्यात मनसे स्टाईलने शोध
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 05, 2023 | 9:47 AM
Share

निखिल चव्हाण, मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे ( sandeep deshpande attackers) यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचे CCTV समोर आले होते. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी दोन जण ठाण्यातील असल्याचा निष्पन्न झाले आहे. यामुळे ठाणे येथील लक्ष्मी चिराग नगर येथे मनसेचे कार्यकर्ते पोहचले. या ठिकाणी दोन हल्लेखोर वास्तव्य करत असल्याची माहिती ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. आरोपींना शोधण्यासाठी ठाण्यातील मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगरात शोध सुरु केला.

लक्ष्मी आणि चिराग नगरमध्ये दाखल हल्लेखोर राहत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. यावेळी मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हल्लेखोराच्या घरात पाहणी केली. मात्र हल्लेखोर घरी नसल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. दरम्यान मुंबई पोलीसांनी काही जणांना रात्री उशिरा अटक केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यातील एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध घ्यावा अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.

कोण आहेत आरोपी

CCTVत दिसणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, अशोक खरात आणि किसन सोळंकी अशी त्यांनी नावं आहेत. CCTVत दिसणारा हाच अशोक खरात मुख्य आरोपी आहे. खरातवर याआधी मोक्काही लावण्यात आलाय. तसंच त्याच्यावर डोंबिवलीत हत्या आणि ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय की, खरातच्या हातात स्टम्प आहे. हा स्टम्प तो एका कार जवळ ठेवून पुढे निघतोय.

काय आहे कनेक्शन

संदीप देशपांडे यांनी पोलिसांच्या जबाबात, ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि संजय राऊतांचं नाव घेतलंय. याच अशोक खरातचे वरुण सरदेसाईंसोबतचे फोटोही व्हायरल झालेत. काही फोटो हे संजय राऊतांचे भाऊ, सुनिल राऊतांसोबतही आहेत. हेच फोटो देशपांडेंनीही पत्रकार परिषदेत दाखवले. कोरोनाच्या काळातील मुंबई महापालिकेतले घोटाळे बाहेर काढत असल्यानंच हल्ला झाल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले

संदीप देशपांडेंचा रोख वरुण सरदेसाईंबरोबरच संजय राऊतांवर आहे. तर राऊतांनी हल्ला झाला की करवून घेतला म्हणत हल्ल्यावर शंका उपस्थित केलीय.

देशपांडेंवरील हल्ल्याचा तपास आता खंडणी विरोधी पथकाकडे आलाय. त्यामुळं मास्टरमाईंड कोण? आणि हल्ल्याचा हेतू काय होता, हे उघडकीस आणण्याचं आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर असेल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.