AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेला जाण्याआधी मोदी फोन करतात आणि लतादीदींना म्हणतात, ‘हॅलो, मैने फोन किया क्यूंकी…’

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. लतादीदींच्या निधनाने सूर पोरके झाले आहेत. लतादीदींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यामधील संवादाची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

अमेरिकेला जाण्याआधी मोदी फोन करतात आणि लतादीदींना म्हणतात, 'हॅलो, मैने फोन किया क्यूंकी...'
लता मंगेशकर
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 1:54 AM
Share

मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. लतादीदींच्या निधनाने सूर पोरके झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी  मुंबईतील शिवाजी पार्क इथं लता मंगेशकर यांना पुष्पचक्र अर्पण करत त्यांचं अंत्यदर्शनं घेतलं. यानंतर त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांशी संवादही साधला. लता मंगेशकर यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. लता मंगेशकर यांचे काही फोटो शेअर करत मोदींनी म्हटलं होतं की,… मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही, की मला किती दुःख झालंय. दयाळू लतादीदी आपल्याला सोडून गेल्यात. त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरुन न येण्यासारखी नाही! दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि लता मंगेशकर यांच्यामधील संवादाचा एक ऑडीओ व्हायरल (Audio viral) होत आहे. बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने हा ऑडीओ प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. त्यावेळचा हा ऑडीओ आहे. या ऑडीओमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये त्यावेळी जो संवाद झाला तो संवाद आहे.

काय आहे नेमकं या ऑडीओमध्ये

लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कॉल केला होता. त्यांनी जेव्हा लता मंगेशकर यांना फोन केला तेव्हा मोदी म्हणाले की, नमस्कार दीदी मी नरेंद्र मोदी बोलत आहे. मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. मी तुमच्या वाढदिवशी भारतामध्ये असणार नाही, मी अमेरिकेच्या दौऱ्यावर चाललो आहे. म्हणून त्यापूर्वीच मुद्दाम तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यानंतर लतादीदींनी देखील मोठ्या अस्थेवाईकपणे मोदींची विचारपूस केली. तसेच ते अमेरिकेमधून केव्हा परतणार आहेत हे देखील त्यांना विचारले.

जुन्या आठवणींना उजाळा

दरम्यान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्या या संभाषणामध्ये दोघांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना मोदी दीदींना म्हणाले की, तुम्ही प्रचंड कठीण असे परिश्रम करून ही सिद्धी प्राप्त केली आहे. मी जेव्हा जेव्हा पण तुम्हाला फोन करतो तसेच भेटतो तेव्हा तुम्ही मला आवर्जून सांगता की तुमची आई गुजराती होती. हे ऐकून मला अभिमान वाटतो. तसेच मी जेव्हाही तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्ही मला गुजराती पदार्थ करून खाऊ घालता. मुंबई दौऱ्याच्यावेळी तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा होती, मात्र कामाच्या व्यस्थतेमुळे मी भेटू शकलो नाही. मात्र मी जेव्हा अमेरिकेवरून भारतात येईल तेव्हा नक्की भेटूयात. दरम्यान या संभाषणादरम्यान लतादीदी यांनी मोदींच्या आईची देखील मोठ्या अस्थेवाईकपणे चौकशी केली. ही ऑडीओ क्लीप लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…

Lata Mangeshkar Funeral : पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कवर वाहिली लतादीदींना श्रद्धांजली, दिग्गजांची उपस्थिती

Lata Mangeshkar Funeral Pics : अंत्ययात्रेत जनसागर उसळला! अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.