क्रुझ ड्रग्जप्रकरणात कोणते मंत्री, आमदार होते याचा तपास करा, मी पुरावे देतो, मोहित कंबोज यांचा पोलीस आयुक्तांना आवाहन
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा नव्याने तपास करणार असल्याचं वृत्त आहे. त्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री आणी आमदार होते याचा तपास करण्यात यावा.
मुंबई: मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा नव्याने तपास करणार असल्याचं वृत्त आहे. त्यावर भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री आणी आमदार होते याचा तपास करण्यात यावा. मी पुरावे द्यायला तयार आहे. हवं तर मला चौकशीला बोलवा, असं आवाहन मोहित कंबोज यांनी मुंबई पोलिसांना (mumbai police) केलं आहे. नव्या आयुक्तांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करावा. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडू नका. मला बोलवा. जेवढे पुरावे आहेत ते मी तुम्हाला देईन. अधिवेशनात बसलेल्यांपैकी कोण या प्रकरणात गुंतले आहे त्याची माहिती मी द्यायला तयार आहे. ते मी तुम्हाला सांगायला तयार आहे, असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संजय पांडे हे कंबोज यांना बोलवतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्विट करून हे आवाहन केलं आहे.
नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे क्रुझ प्रकरणाचा पुन्हा तपास करणार असल्याचं समजलं. क्रुझ प्रकरणाशी संबंधित एनसीबीचे अधिकारी होते, त्यात भ्रष्टाचार झाला होता. त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मध्यंतरी हा तपास बंद करण्यात आल्याचा रिपोर्ट आला होता. त्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. मी त्याचं स्वागत करत आहे, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे
सुनील पाटील पासून किरण गोस्वीपर्यंत ते प्रभाकर सईलपर्यंत आणि नवाब मलिकपासून शिवसेनेचा एक मंत्री आणि एक बडा नेता तसेच काँग्रेसचे कोणते आमदार आणि मंत्री यांचा या केसमध्ये काय रोल होता. परळच्या घटनेत कुणी कोऑर्डिनेट केलं. त्यात कोण दलाल होते. कोणते लोक होते, कोण चर्चेत होते. पण हे सर्व प्रकरण नंतर दाबण्यात आलं. काही लोकांची साक्ष का नोंदवली गेली नाही. कोर्टात दिलेलं प्रतिज्ञापत्रं आणि जे सत्य आहे त्यात काही अंतर आहे का? या सर्व गोष्टींचं दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
I Welcome The Decision Of Mumbai Police To Register A FIR in Aryan Khan Case ! Who All 3 Cabinet Ministers – MLA And Brokers Were Involved Should Be Exposed ! Role of NCB Officers / Sunil Patil / Parel Incident Should Be Investigated ! Mumbai Police Should Expose All ! pic.twitter.com/1t8SmFLg6O
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) March 5, 2022
संबंधित बातम्या:
नागपूर मनपा निवडणूक, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती काय?
VIDEO | राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला चोप