मनी लॉण्ड्रिंग प्रकरण: येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह पत्नी बिंदू यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात इडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरण: येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह पत्नी बिंदू यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 8:06 AM

मुंबई : येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात इडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. मुंबई सेशन कोर्टातील विशेष पीएलएलए कोर्टात हे आरोप पत्र दाखल केले आहे. गैतम थापर यांच्या अवंथा कंपनीला 1900 कोटी रुपये कर्ज अवैधरित्या दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात राणा आणि थापर या दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप?

गौतम थापर यांची  अवंथा नावाची कंपनी आहे. या कंपनीला येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांनी नियमांचे उल्लंघन करून, तब्बल 1900 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याबदल्यात राणा यांना गौतम थापर यांनी त्यांचा दिल्लीमधील बंगला अर्ध्या किमतीला विकला होता, असा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी आता राणा कपूर त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात इडीने  विशेष न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मर्जीतल्या लोकांना अवैधरित्या कर्ज दिल्याचा आरोप

दरम्यान  येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवारच संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिन्दू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. बेकायदेशीर कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात राणा कपूर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी 2004 मध्ये येस बँकेची स्थापना केली होती. त्यानंतर राणा यांनी येस बँकेतून स्वत: च्या मर्जीने जवळच्या लोकांना मोठे कर्ज दिल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

संबंधित बातम्या

धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

Ulhasnagar : उल्हासनगरचा ‘चांदनी डान्सबार’ अखेर सील, आतापर्यंत तब्बल 80 वेळा झाली होती कारवाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.