शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, अमोल कोल्हे राजीनामा देणार?

खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार असल्याची चर्चा समोर आलेली. त्यानंतर अमोल कोल्हे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आलीय. या बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.

शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, अमोल कोल्हे राजीनामा देणार?
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 8:35 PM

मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर अमोल कोल्हे ‘सिल्व्हर ओक’ बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या मनात अस्वस्थता होती ती आपण पत्राच्या मार्फत लिखित स्वरुपात शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यावर शरद पवार यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

“खरंतर मी माझी अस्वस्थता शरद पवार यांच्यासमोर मांडली. आज एकूण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि एकूण घडामोडी बघितल्या तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायीत्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मी शरद पवार यांना जे पत्र दिलंय त्याच एवढंच सांगितलंय की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याच भूमिका करत आलो आहे. त्यामुळे 350 वर अस्तित्वात असलेले स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला स्वत:चं नाही तर रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श घेऊन मी महाराष्ट्रात आलो”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

“आता एकूण जी परिस्थितीत पाहतोय, ते पाहिल्यावर मतदारांना फसवल्यासारखं होतंय का? ही सगळी अस्वस्थथा होती. म्हणून मी साहेबांकडे मार्गदर्शन मागितलं होतं. हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणांमध्ये आहे. या तरुणाईचा लोकशाही प्रणाली आणि मुल्यांवर विश्वास बसावा म्हणून काम करणं गरजेचं आहे, याची आवर्जून आठवण शरद पवार यांनी करुन दिली. त्याचबरोबर शिरूर मतदारसंघातील जनतेने पाच वर्षांसाठी ही जबाबदारी दिली आहे. आता अनेक कामं मार्गी लागत आहे. अशावेळी या नागरिकांच्या विश्वासासाठी ठाम राहणं याची जाणीव शरद पवार यांनी करुन दिली”, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“मी शरद पवार यांच्यासोबत आहे. मी शरद पवार यांनी उद्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावलेल्या बैठकीत येईन”, असं कोल्हेंनी स्पष्ट केलं. “अस्वस्थता प्रत्येकाच्या मनात आहे. तुम्ही सोशल मीडियावर सगळ्या ठिकाणी बघितलं तर ते लक्षात येईल. ज्यावेळेला हे सगळं घडलं तेव्हा मला महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे फोन आले. ते सांगत आहेत की, आमच्या मनातली अस्वस्थता तुम्ही व्यक्त करत आहात. विचारधारा, नैतिकता या विषयावर नेमकं आम्ही काय सांगायचं? असे तरुणांचे प्रश्न होते”, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

अमोल कोल्हे राजीनामा देणार?

“माझी अस्वस्थता जी होती ती मी लिखित स्वरुपात शरद पवार यांच्याकडे दिली. त्याचा संपूर्ण ड्राफ्टही मी तुमच्याशी शेअर करेन. हा ड्राफ्ट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकी अस्वस्थता काय होती. त्यावर मला शरद पवार यांनी हे उत्तर दिलं”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

“शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हे माझं वाक्य कायम असेल. सगळे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याला त्यांचे वैयक्तिक कारणं असतील. पण माझं वैयक्तिक कारण काय आहे? याचं उत्तर मिळायला हवं. शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. आज मला शरद पवारांनी त्याची आठवण करुन दिली. या मतदारांच्या मताशी बांधील राहणं हे माझं कर्तव्य आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“मी कालही सांगून झालंय की शपथविधीचा मला कोणतीही कल्पना नव्हती. ज्या नेत्यांनी हा निर्णय घेतलाय ते ३० ते ३५ वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी काही बोलणं उचित ठरणार नाही. पण मला त्यांच्या शपथविधीची कल्पना नव्हती”, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

“आमदार पळवापळवी, पक्ष फोडाफोडी पाहिल्यानंतर मतदारांच्या विचारांशी प्रतारणा होत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनात अनेक महिन्यांपासून आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.