Navneet Rana: नवनीत राणांनी दंड थोपटले, शिवसेनेविरोधात मुंबई महापालिकेच्या प्रचारात उतरणार; राणा म्हणाल्या, शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका…

Navneet Rana: राज्यातील ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केला. 14 दिवस तुरुंगात ठेवायला माझी अशी काय चूक होती?

Navneet Rana: नवनीत राणांनी दंड थोपटले, शिवसेनेविरोधात मुंबई महापालिकेच्या प्रचारात उतरणार; राणा म्हणाल्या, शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका...
नवनीत राणांनी दंड थोपटले, शिवसेनेविरोधात मुंबई महापालिकेच्या प्रचारात उतरणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:46 PM

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर थेट शिवसेनेला ललकारले आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (bmc) शिवसेने विरोधात आपण प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. कोणत्या पक्षाच्या बाजूने प्रचार करणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. मात्र, जे प्रभू श्रीरामाला मानतात. ज्या ज्या रामभक्तांना माझी गरज आहे, तिथे तिथे जाऊन मी निवडणूक प्रचार करणार आहे, असं सांगतानाच मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईकरांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका उद्ध्वस्त करण्यासाठीच मी ताकदीने मैदानात उतरणार आहे, असं नवनीत राणा यांनी जाहीर केलं. तसेच दम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray) माझ्याविरोधात कोणत्याही मतदारसंघातून लढवून दाखवावं. त्यांना नारीशक्ती काय असते हे दाखवून देऊ, असं आव्हानही नवनीत राणा यांनी केलं. त्या मीडियासी संवाद साधत होत्या.

राज्यातील ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केला. 14 दिवस तुरुंगात ठेवायला माझी अशी काय चूक होती? हनुमान चालिसा म्हणणं आणि प्रभू रामाचं नाव घेणं हा काही गुन्हा आहे का?, असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी केला. ठाकरे घराण्याकडे दोन पिढ्यांपासूनमुंबई महाालिका आहे. तुमची ही भ्रष्टाचाराची लंका मीच नष्ट करणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्याविरोधात प्रचारासाठी मुंबईत येणार. मुंबईला न्याय देण्यासाठी येणार. मी मुंबईची मुलगी आहे. त्यामुळे मी तुमच्याविरोधात लढा देणार. भ्रष्टाचारी लंकेला पराभूत करण्यासाठी माझी जिथे जिथे गरज पडेल तिथे मी जाऊन प्रचार करेल. रामभक्त सांगतील तिथेच मी प्रचारासाठी येईल, असं नवनीत राणा म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने बाहेर पडणार आहे. त्यावेळी लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने तुम्ही जो अन्याय केला. त्याला जनता उत्तर देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझा लढा सुरूच राहील

मी अशी काय चूक केली. की मला त्याची शिक्षा दिली. हनुमान चालिसा म्हणणं गुन्हा आहे का? रामाचं नाव घेणं गुन्हा असेल तर 14 दिवस नाही तर 14 वर्ष मी तुरुंगात जाईल. 14 दिवसात महिलेचा आवाज दाबला जाणार नाही. माझा लढा सुरूच राहील. माझ्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली. जनतेने पाहिलं आहे. क्रुरबुद्धीने कारवाई केली. महाराष्ट्रातील सून आणि मुलीवर कारवाई केली. त्यावर सर्वांना दु:ख आहे. सर्वांशी मी आरामात बोलेल. कोर्टाने जी ऑर्डर दिली आहे. त्याचा सन्मान करते. मी या केसवर बोलणार नाही. माझ्यावर जो अत्याचार झाला. लॉकअपपासून जे झालं त्यावर मी बोलेल, असंही ते म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.