धक्कादायक, अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी; हाजी अली जंक्शनलाही 10 मिनिटे कार थांबली
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. (Mukesh Ambani's family threatened: Exclusive details of police probe )
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजनुसार त्या रात्री हाजी अलीला ही संदिग्ध कार 10 मिनिटे उभी असल्याचं आढळून आलं आहे. तसेच अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. (Mukesh Ambani’s family threatened: Exclusive details of police probe )
मुकेश अंबानी यांच्या अलिशान बंगल्याबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. ही कार 24 फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर पार्क करण्यात आली होती. ही कार त्या आधी 12.30 वाजता हाजी अली जंक्शनला पोहोचली होती. या ठिकाणी ही कार 10 मिनिटे थांबली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिलेटीनच्या कांड्या सापडल्या
या कारमध्ये 20 जिलेटीन सापडले होते. हे जिलेटीन प्रामुख्याने भूसुरुंग स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येतात. या कारमध्ये एक पत्रंही मिळालं होतं. त्यात धमकीही देण्यात आली होती. या गाडीवर खोटा नंबर टाकण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या कारच्या खऱ्या मालकाचा शोध लावला आहे. ही कार चोरून आणल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही कार चोरून आणल्याचं उघडकीस आलं आहे.
तपासात काय उघड झालं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अँटालिया बंगल्याबाहेर एक महिन्यांपर्यंत संदिग्ध व्यक्तींनी रेकी केली होती. तसेच अंबानींच्या ताफ्याचा अनेक वेळा पाठलागही केला होता. या कारमध्ये 20 नंबर प्लेटही आढळून आल्या आहेत. यातील अनेक नंबर्स हे अंबानींच्या ताफ्यातील कारच्या नंबरशी मिळते जुळते आहेत. बंगल्याबाहेर सापडलेल्या कारपाठोपाठ एक इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून याच कारमधून रेकी केली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्या शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कार पार्क करतानाही दिसत आहे. मात्र फेस मास्कमुळे त्याची ओळख पटण्यात अडचणी येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Mukesh Ambani’s family threatened: Exclusive details of police probe)
LIVE | महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/hjNpmR3W4Q
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021
संबंधित बातम्या:
मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी
VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली कार, घातपाताच्या उद्देशाचा संशय
रिलायन्स जियोचा सुपरफास्ट वेब ब्राऊझर JioPages लाँच, मराठीसह आठ भारतीय भाषा उपलब्ध
(Mukesh Ambani’s family threatened: Exclusive details of police probe )