Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था
Heat Wave : राज्यातील वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी एसीची मागणी वाढली आहे. मुंबईकरही जेथे शक्त तेथे एसीमध्ये थांबत आहे. अगदी प्रवास करतानाही एसी लोकल निवडत आहे. मग या एसी लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. या तापमान वाढीमुळे अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय. वाढत्या तापमानामुळे राज्यातील सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबई शहरातही एप्रिल महिन्यात ३८ अंश सेल्सियसवर तापमान पोहचले आहे. उष्णतेची लाट पाहता गारवा मिळवण्यासाठी हवे ते उपाय नागरिक करत आहे. मुंबईत प्रवास करताना AC लोकलचा आधार घेत आहे. परंतु या लोकलमधून प्रवास करताना एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
उन्हाळ्यात मुंबईच्या AC लोकलची कशी झाली अवस्था #VrialVideo #Mumbai pic.twitter.com/YrZK9YxX0K
हे सुद्धा वाचा— jitendra (@jitendrazavar) April 21, 2023
काय आहे व्हिडिओत
मुंबईत शहराचे तापमान वाढत आहे. यामुळे मुंबईकर नागरिकांचे हाल होत आहे. प्रवास असो की कार्यालय सर्वत्र एसीची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक मुंबईकर शक्य तेव्हा AC लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सध्या मुंबईतील AC लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हि़डिओत मुंबईतील एसी लोकलचा एसी बंद पडलेला दिसत आहे, यामुळे लोक दरवाजा उघडून गेटवर उभे राहून प्रवास करताना दिसत आहेत.
कुठला आहे तो व्हिडिओ
कधी कधी असे देखील होते की जेव्हा लोक एसीसाठी पैसे देतात आणि जेव्हा एसी चालत नाही तेव्हा काम देशी शैलीत करावे लागते, असेच हा व्हिडिओ पाहून म्हणावे लागले. मुंबईच्या लोकल एसी ट्रेनचा एसी का बंद पडला, हे समजले नाही, परंतु त्यानंतर लोकांनी पुन्हा साध्या लोकलप्रमाणे काम केले. एसी रेल्वेचे दरवाजे उघडून दारात उभे राहून प्रवास करताना व्हिडिओत दिसत आहे. रेल्वेच्या आतील आवाजावरून कळते की, पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्थानकाजवळचा हा व्हिडिओ आहे. पश्चिम रेल्वेचे पीआरओ अनुभव सक्सेना यांनी सांगितले की, हा व्हिडिओ आज सकाळचा आहे, काही वेळाने ही समस्या दूर झाली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे.
हे ही वाचा
Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल
Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय