आजारी दाऊद इब्राहिमला धक्का, भारताने घेतला मोठा निर्णय, डी कंपनी अडचणीत

Dawood Ibrahim Properties | पाकिस्तानात दाऊद इब्राहिम याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या बातमीला पाकिस्तान आणि भारताकडूनही दुजोरा दिला नाही. परंतु अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याला जोरदार धक्का भारताने दिला आहे. भारताच्या या निर्णयामुळे डी कंपनी अडचणीत आली आहे.

आजारी दाऊद इब्राहिमला धक्का, भारताने घेतला मोठा निर्णय, डी कंपनी अडचणीत
Mumbai Underworld don Dawood Ibrahim
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 9:17 AM

मुंबई, दि.24 डिसेंबर | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या बातमीला पाकिस्तान आणि भारताकडूनही दुजोरा दिला नाही. परंतु अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याला जोरदार धक्का भारताने दिला आहे. भारताच्या या निर्णयामुळे डी कंपनी अडचणीत आली आहे. केंद्र सरकारने दाऊद याच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव येत्या पाच जानेवारी रोजी होणार आहे. हा लिलाव दुपारी दोन ते 2.30 दरम्यान होणार आहे.

चार संपत्तीचा लिलाव होणार

दाऊद इब्राहिम हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रहिवाशी होता. मुंबके हे त्याचे गाव आहे. या ठिकाणी असलेल्या त्याच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. रत्नागिरी मुंबके येथे दाऊदचा बंगला आणि आंब्याची बाग आहे. एकूण चार जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात शेत जमिनी आहे. जवळपास 20 गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये तर दुसऱ्या शेतजमिनीची किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी झाला होता लिलाव

दाऊद याच्या 11 मालमत्तेचा लिलाव 2000 मध्ये आयकर विभागाकडून करण्यात आला होता. परंतु त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीच आले नव्हते. परंतु मागील काही वर्षांपासून तपास संस्था त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. 2018 मध्ये मुंबईतील नागपाडा येथेली दाऊदचे हॉटेल आणि एक गेस्टसोबत एका बिल्डिंगची विक्री करण्यात आली होती. त्यानंतर दाऊदची बहिन हसीना पारकर हिचा दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यात आला होता. नागपाडामधील 600 वर्ग फूटचा फ्लॅट एप्रिल 2019 मध्ये 1.80 कोटींत विकला गेला होता. त्यानंतर पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली मालमत्ता एका ट्रस्टने 3.51 कोटीत घेतली होती. 2020 मध्ये रत्नागिरीत दाऊद इब्राहिम याच्या परिवाराची असलेली 1.10 कोटीची संपत्ती विकली गेली होती. त्यात दोन प्लॅट एक पेट्रोल पंपचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.