Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Boat Capsized: नेमका अपघात कसा झाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले…

Mumbai Boat Capsized: नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला

Mumbai Boat Capsized: नेमका अपघात कसा झाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...
Mumbai Boat Capsized
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 8:39 PM

Mumbai Boat Capsized: मुंबईतील समुद्रात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. गेट ऑफ इंडियाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन जण नौदलाचे कर्मचारी तर दहा जण पर्यटक आहेत. नौदलाच्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. हा अपघात कसा झाला ते त्यांनी सांगितले आहे.

कसा झाला अपघात

नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू

नीलकमल आणि नौदलाची स्पीड बोट यांच्या झालेल्या या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आहेत. तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना नौदलाच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. ११ नौदलच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्वांना वाचवण्यात आले आहे. आज संध्याकाळी ७.३० पर्यंत ही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती गुरुवारी सकाळ मिळेल. कोणी मिसिंग असेल तर उद्या सकाळपर्यंत कळले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मृत्यू झालेल्यांना पाच लाख

दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नौदलाकडून देण्यात आली माहिती

दरम्यान, या घटनेबाबत नौदलाने रात्री माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १८ डिसेंबर २०२४ रोजी सुमारे दुपारी चार वाजता नौदलाच्या बोटीची इंजिन चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि नीलकमल या प्रवासी बोटीला ती बोट धडकली. तटरक्षक दल आणि पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचावकार्य केले.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.