Mumbai : मुंबई कोस्टल रोडच्या संरक्षक भिंतीचे 73 टक्के काम पूर्ण, महाकाय लाटांपासून संरक्षण होणार, पावसाळ्यातही काम सुरुच

कोस्टल रोडचे काम 55.22 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे. वीस मिनिटांच्या अंतरासाठी एखादा तास वाहतूककोंडीमध्ये अडकावे लागते. यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही जास्त लागते. हे टाळण्यासाठी महापालिकेकडून हा कोस्टल रोड तयार केला जातोय. कोस्टल रोडमध्ये दोन मोठी बोगदी असणार आहेत.

Mumbai : मुंबई कोस्टल रोडच्या संरक्षक भिंतीचे 73 टक्के काम पूर्ण, महाकाय लाटांपासून संरक्षण होणार, पावसाळ्यातही काम सुरुच
Image Credit source: freepressjournal.in
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:11 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरू आहे. 2023 पर्यंत हा कोस्टल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. कोस्टल रोडमुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. मुंबईमध्ये वाहतूककोंडी ही एक मोठी समस्या आहे, या रोडमुळे (Coastal Road) ही देखील समस्या दूर होईल. आता पावसाळ्याच्या हंगामाला सुरूवात झालीये. मात्र, असे असताना देखील कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे. कोस्टल रोडचे अरबी समुद्राच्या लाट्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचे कामही (Work) आता 73 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जातयं. पावसाळ्याला सुरूवात झालीये.

कोस्टल रोडचे काम 55.22 टक्के पूर्ण झाले

कोस्टल रोडचे काम 55.22 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे. वीस मिनिटांच्या अंतरासाठी एखादा तास वाहतूककोंडीमध्ये अडकावे लागते. यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही जास्त लागते. हे टाळण्यासाठी महापालिकेकडून हा कोस्टल रोड तयार केला जातोय. कोस्टल रोडमध्ये दोन मोठी बोगदी असणार आहेत. त्यामधील एका बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे काम प्रगती पथावर सुरू आहे. प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकमध्ये 10.58 किलो मीटरचा कोस्टल रोड बांधला जातोय. या संपूर्ण कोस्टल रोडला तब्बल 12 हजार 621 कोटी रूपये खर्च येणार आहे.

हे सुद्धा वाचा

बोगद्याचे 2 किलो मीटरचे काम पूर्ण

कोस्टल रोड वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी कामगार अहोरात्र काम करत आहेत. तब्बल 4 हजार 500 कामगार कोस्टल रोडच्या कामासाठी लावण्यात आले आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोस्टल रोडच्या कामावर स्वत: लक्ष ठेऊन आहेत. बोगद्याचे 2 किलो मीटरचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे. बोगद्यांमधील हवा चांगली राहावी, यासाठी वायुविजनाची सकार्डो यंत्रणा बोगद्यामध्ये बसवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालिका नियंत्रण कक्ष, पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येणार आहे. ही खास यंत्रणा या बोगद्यात बसवण्यात येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.