Mumbai Crime : मढ आयलंडच्या हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळला, प्रियकराला अटक, आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

मढ आयलंडच्या हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळला...

Mumbai Crime : मढ आयलंडच्या हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळला, प्रियकराला अटक, आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 8:50 AM

मुंबई : मुंबईतील मढ आयलंड (Mumbai Madh Island) येथील एका हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह (Woman Murder) आढळल्याने खळबळ उडाली.काल (मंगळवार) संध्याकाळी ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही महिला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये गेली होती. रात्री उशिरा दोघांमध्ये काही कारणांवरून भांडण झालं. त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरही ऐकू येत होता. मंगळवारी पहाटे महिलेचा प्रियकर हॉटेलमधून एकटाच पळून गेला. हॉटेलची चेक-आउटची वेळ संपल्यानंतरही ती महिला तिच्या खोलीतून बाहेर न आल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला आणि हॉटेलची खोली उघडली. तेव्हा महिलेची मृतदेह बेडवर पडलेला आढळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेचे तिच्या प्रियकराशी भांडण झाल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. भांडणानंतर प्रियकराने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केलीय आणि पळून गेला. याआधीही हे दोघेही अनेकदा या हॉटेलमध्ये आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय आरोपीने गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे.

महिलेचा मृतदेह आढळला

मुंबईतील मढ आयलंड येथील एका हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. काल (मंगळवार) संध्याकाळी ही घटना घडली आहे.

हत्येचा शोध कसा लागला

सोमवारी रात्री ही महिला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये गेली होती. रात्री उशिरा दोघांमध्ये काही कारणांवरून भांडण झालं. त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरही ऐकू येत होता. मंगळवारी पहाटे महिलेचा प्रियकर हॉटेलमधून एकटाच पळून गेला. मंगळवारी पहाटे महिलेचा प्रियकर हॉटेलमधून एकटाच पळून गेला. हॉटेलची चेक-आउटची वेळ संपल्यानंतरही ती महिला तिच्या खोलीतून बाहेर न आल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला आणि हॉटेलची खोली उघडली. तेव्हा महिलेची मृतदेह बेडवर पडलेला आढळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

हे सुद्धा वाचा

आरोपीला अटक

पोलिसांनी घटनास्थळी जात तपास केला असता. सगळे धागेदोरे हे या महिलेच्या प्रियकराकडे जाऊन पोहोचत होते. म्हणून मग मालवणी पोलिसांच्या पथकाने या व्यक्तीचा शोध घेतला आणि घटनेनंतर काही तासांतच आरोपीला अटक केली. अमित आनंद भुवड असं अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचं वय 36 वर्षे आहे. अमालुमरी चार्ली असं मृत महिलेचे नाव असून ती 47 वर्षांची होती. दोघेही विवाहित आहेत.

अटकेनंतर गुन्ह्याची कबुली

अमित आनंद भुवड या आरोपीला अटक झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे, डीसीपी विशाल ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.