AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? सोडलेल्या 6 जणांची नावं काय? समीर वानखेडे म्हणाले

एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावं जाहीर करण्यास नकार देण्यात आला.

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? सोडलेल्या 6 जणांची नावं काय? समीर वानखेडे म्हणाले
ज्ञानेश्वर शिंदे, एनसीबी अधिकारी
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:29 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेळ होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं, असा आरोप मलिक यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावं जाहीर करण्यास नकार देण्यात आला. (Was Parth Pawar involved in drugs party?, NCB officials answer journalists’ questions)

पार्थ पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले की, जे नाव तुम्ही घेत आहात. सध्या तपास सुरु आहे आणि असं कुठलंही नाव घेणं योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार एजन्सी आहोत आणि कुठलंही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे त्यावर बोलतोत, जे पुरावे आहेत त्यावर बोलतोत. बाकी नाही, असं एनसीबी अधिकारी समिर वानखेडे म्हणाले.

‘सर्व साक्षीदारांना 2 तारखेच्या ऑपरेशन आधी एनसीबी ओळखत नव्हती’

त्याचबरोबर सर्व ऑपरेशन हे वास्तविक वेगवेगळ्या आधारावर असते. त्यामुळे पुरावे गोळा करणं कठीण असतं. एकूण नऊ साक्षीदार या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यामध्ये मनिष भानुशाली आणि के पी गोसावी हे देखील होते. या सर्व साक्षीदारांना दोन तारखेच्या ऑपरेशन आधी एनसीबी ओळखत नव्हती. या ऑपरेशन दरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आलं होतं त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूीमीवर त्यांना एनसीबी कार्यालयात आणलं गेलं, असंही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

‘हे एक मोठं नेटवर्क, कारवाई सुरुच राहणार’

आम्ही आमच्या माहिती आणि लोकांच्या माहितीच्या आधारावर काम करतो. आम्हाला अशाच प्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ वर कारवाई केली. आमच्या पद्धतीनुसार आम्हाला 2 साक्षीदार नेमावे लागत असतात. यावेळी आम्हाला तात्काळ जायचं असतं. यावेळी त्यांचा पूर्व इतिहास तपासणं शक्य नसतं. मनीष भानुशाली, गोसावी यांच्या बाबत एनसीबीला काही माहिती नव्हती. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना आणण्यात आलं. आम्ही 14 जणांना एनसीबी कार्यलयात आणलं होतं. कायद्यानुसार त्यांचे जबाब घेण्यात आले. त्यानंतर 14 पैकी 8 जणांना अटक केली आणि 6 जणांना सोडलं. ज्या 8 जणांना अटक किलो त्यांना प्रथम एक दिवस त्या नंतर 4 दिवस आणि त्यानंतर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. कोठडीत असताना आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी 6 ठिकाणी आम्ही कारवाई केली आहे. हे एक मोठं नेटवर्क आहे. हे आपल्या तरुणांना बरबाद करत आहेत. आमची कारवाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली.

इतर बातम्या :

‘खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं’, उद्धव ठाकरेंचा पलटवार

‘जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यात राणेंचं योगदान, दुसरा कुणी इथं येऊच शकत नाही’, उद्धव ठाकरेंसमोर राणेंचा हल्लाबोल

Was Parth Pawar involved in drugs party?, NCB officials answer journalists’ questions

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....