Vande Bharat Express : कोकणवासीयांचा प्रवास होणार जलद, मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची तारीख आली
Vande Bharat Express : राज्यातून लवकरच आता चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. जून महिन्यातच ही गाडी सुरु होणार आहे. या दिवशी देशभरातून पाच वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवी झेंडी दाखवणार आहे.
मुंबई : ओडीशामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे ३ जून रोजी सुरु होणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द झाला होता. कोकणातून जाणाऱ्या या वंदे भारतचे एक्स्प्रेसचे उद्घाटन कधी होणार याची सर्व कोकणवासीय वाट पाहत होते. आता ओडिशातील अपघातामुळे रेड सिग्नल मिळालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस कधीपासून मुंबई-गोव्यासाठी धावणार त्याची तारीख आली आहे.
कधीपासून होणार गाडी सुरु
कोकणवासीयांना जलद प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमुळे करता येणार आहे. यामुळे गाडीसाठी सर्व कोकणवासीय प्रतिक्षा करत होते. आता त्यांची संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी मुंबई-गोवा गाडीला हिरवी झेंडी दाखवणार आहे. राज्यातून सुरु होणारी ही चौथी गाडी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यात गोवा-मुंबईसह पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या गाडींचा समावेश आहे. या पाच नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यावर देशातील वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होणार आहे. या गाड्या आरामदायी आहेत अन् आधुनिक सुविधा त्याच्यात आहे. यामुळे या गाड्यांना मोठी मागणी आहे.
भाडे काय असणार
मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची बुकींग अजून सुरु झाली नाही. या गाडीमध्ये एससी चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे असणार आहे. एकूण 8 डबे असणारी ही गाडी असणार आहे. तिचे चेअर कारचे प्रवास भाडे 1100 ते 1600 दरम्यान असण्याची शक्यता आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 2200-2800 च्या दरम्यान असणार आहे.
राज्यातून चौथी गाडी
मुंबई ते गांधीनगर ट्रेन, मुंबई ते सोलापूर वंदे भारत अन् मुंबई ते साईनगर (शिर्डी) अशी तीन वंदे भारत एक्स्प्रेस यापूर्वी राज्यात सुरु आहे. पहिली गाडी मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता चौथी गाडी सुरु होणार आहे. त्याचा फायदा कोकणातील लोकांनाही होणार आहे.