BIG BREAKING | मध्य रेल्वे मार्गावर धिम्या मार्गावर अनपेक्षित घटना
मुंब्रा रेल्वे स्थानकावर एक अनपेक्षित घटना घडली. त्यामुळे वाहतुकीवर हा परिणाम झालाय. पण आता वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन रुळाखाली घसरल्याची घटना समोर आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेत काही नुकसान झाल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. मध्य रेल्वे मार्गाची धिम्या गतीवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. रात्रीची वेळ ही गर्दीची वेळ असते. लाखो नागरीक आपापली कामे आटोपून घराकडे निघाले असतात. ते आपल्या कार्यालयातून घरी परतत असतात. त्यासाठी ते मुंबई लोकलने प्रवास करतात. पण या प्रवाशांना अनपेक्षित अशी बातमी समोर आली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकावर एक अनपेक्षित घटना घडली. त्यामुळे वाहतुकीवर हा परिणाम झालाय. पण आता वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंब्रा स्थानकात फलाट क्र. 1 वर टिटवाळा स्लो लोकल ट्रेन आली. यावेळी या ट्रेनचा पहिला डब्बा हा प्लॅटफॉर्मच्या काठाला धडकला. या घटनेमुळे ट्रेन काही काळासाठी तिथे थांबली होती. त्यानंतर तिथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. 9.20 ते 9.45 या वेळेत ही ट्रेन मुंब्रा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबवण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
At Mumbra station Platform no. 1-
CSMT to TITWALA Slow local-
Edge of platform touched to coach of train. Due to rubbing, train checked by staff. It’s found normal.
Train detained from 21.20 hrs to 21.45 hrs at Mumbra Platform no.1. Train departed now at PF no. at 21.45 hrs
— Central Railway (@Central_Railway) July 5, 2023
संबंधित घटनेमुळे K117 कल्याण स्लो लोकल, A57 अंबरनाथ स्लो लोकल, DK21 कल्याण स्लो लोकल, DL49 डोंबिवली स्लो लोकल या गाड्या 9.20 ते 9.45 या वेळेत मागे ठेवण्यात आल्या होत्या, असंही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.