Mumbai Rains Update: मुंबईत पावसात अडकला, या क्रमांकावर मदतीसाठी साधा संपर्क

all center number in rain: नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेऊ नये. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपतकालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Mumbai Rains Update: मुंबईत पावसात अडकला, या क्रमांकावर मदतीसाठी साधा संपर्क
call center number in rain
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 12:12 PM

मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाचा कहरचा फटका बसला आहे. सहा तासांत मुंबईतील ३३० मिमी पाऊस झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मुंबईत आपत्कालीन कर्मचारी व अधिकारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित आहे. तसेच महानगरपालिकेचे सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व यंत्रणा विविध ठिकाणी कार्यरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले आहे. मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. त्यामुळे मुंबई तुंबली आहे.

मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेऊ नये. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपतकालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.

रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. गरज नसताना घरा बाहेर पडू नका. नदी, नाले, समुद्र किनारी, धबधबे जाऊ नका, असे आदेश जिल्हाधिकारींनी दिले आहे. तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी रायगड यांचे शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रायगड- अलिबाग मुरुड मार्गावरील छोट्या पुलाचा काही भाग खचला आहे. मुरुड तालुक्यातील चिकणी येथील पूल रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला आहे. बॅरीगेडींग करून खचलेल्या बाजूकडील वाहतूक बंद केली आहे.

किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद

मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद करण्यात आल्या आहेत. गडावर चालत जाणार्‍या मार्गावर बॅरीकेड प्रशासनाकडून लावले आहे. पोलिसांचा 24 तास बंदोबस्त राहणार आहे. पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे प्रशासाने गडावरील रोप वे ची सेवा ही बंद केली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.