Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी

मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. (Mumbai Malad building collapses dead and injured patient list)

Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी
Malad Building Collapse
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 8:17 AM

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. (Mumbai Malad west residential building collapses dead and injured patient list)

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश 

यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष 2. अरिफा शेख- 8 वर्ष 3. अज्ञात (पु) – 40 वर्षे 4. अज्ञात (पु)- 15 वर्षे 5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे 6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे 7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे 8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे 9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे 10. अज्ञात (पु) – 8 वर्षे 11. जॉन इराना- 13 वर्ष

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी

  1. मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष 30
  2. धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)
  3. लीम शेख- वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )
  4. रिजवाना सय्यद- वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)
  5. सूर्य मनी यादव- वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)
  6. करीम खान वय वर्ष- 30 (प्रकृती स्थिर)
  7. गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)

बचावकार्य सुरु

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे. मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच अद्याप काही जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

(Mumbai Malad west residential building collapses dead and injured patient list)

संबंधित बातम्या :

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 11 जणांचा दु्र्देवी मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबल्याने 9 जणांचा मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.