घेत होता भरारी उंच नभात, पण कुठेतरी आभाळ फाटलं, महापौर पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन

महापौर किशोरी पेडणकेर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे आज (1 ऑगस्ट) सकाळी मृत्यू झाला (Mumbai Mayor Kishori Pednekar brother dies due to Corona Virus).

घेत होता भरारी उंच नभात, पण कुठेतरी आभाळ फाटलं, महापौर पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन
Follow us
| Updated on: Aug 01, 2020 | 7:49 PM

मुंबई : महापौर किशोरी पेडणकेर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे आज (1 ऑगस्ट) सकाळी मृत्यू झाला. ते 59 वर्षांचे होते. गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील यांच्या आठवणीत किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर कविता पोस्ट केली आहे (Mumbai Mayor Kishori Pednekar brother dies due to Corona Virus).

एप्रिल महिन्यात मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यापैकी काही पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे किशोरी पडणेकर यांनी स्वत:हून 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. होम क्वारंटाईन होण्याआधी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक भागांची पाहणी केली होती. याशिवाय त्यानंतरही त्यांचं काम सुरुच आहे. ते विविध रुग्णालयांना भेट देत आहेत. पीपीई किट परिधान करुन कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करत आहेत.

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. किशोरी यांचे मोठे भाऊ सुनील यांनाही कोरोनाची लागण झाली. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, कोरोनाविरोधात लढताना आज त्यांची प्राणज्योत मालवली (Mumbai Mayor Kishori Pednekar brother dies due to Corona Virus).

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड गतीने वाढत आहे. राज्यात काल (31 जुलै) दिवसभरात तब्बल 10 हजार 320 नवे रुग्ण आढळले. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 14 हजार 284 वर पोहोचला आहे. यापैकी 87 हजार 74 रुग्ण बरे झाले आहेत, तर 6 हजार 353 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधात सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, हे संकट कधी संपेल, याची प्रत्येकजण वाट बघत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.