लसीचे कंत्राट कोणाला दिले?, तुझ्या बापाला, महापौर पेडणेकरांच्या उत्तरावर सोशल मीडियावर संताप

ट्वीटरवर एका युजरने "लसीचं काँट्रॅक्ट कोणाला दिलं?" असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन 'तुझ्या बापाला' असं उत्तर देण्यात आलं आहे. (Kishori Pednekar trolled on social media)

लसीचे कंत्राट कोणाला दिले?, तुझ्या बापाला, महापौर पेडणेकरांच्या उत्तरावर सोशल मीडियावर संताप
महापौर पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 10:14 AM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) सध्या ट्विटरवर ट्रोलिंगचा विषय ठरल्या आहेत. ‘टीव्ही9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिल्यामुळे महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केले असले तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Mumbai Mayor Kishori Pednekar trolled on social media for objectionable language on Twitter says Tujhya Bapala)

नेमकं काय घडलं?

“मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढला गेला आहे. मुंबईकरांच्या एक कोटी लसींसाठी नऊ कंपन्या समोर आहेत” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली होती. या व्हिडीओची लिंक ‘टीव्ही9 मराठी’च्या ट्विटर अकाऊण्टवर शेअर करण्यात आली होती. या ट्वीटवर एका युजरने “काँट्रॅक्ट कोणाला दिलं?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देण्यात आलं आहे.

पेडणेकरांविषयी संताप

महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काय आहे ट्विट?

मूळ ट्वीट पाहा

  (Kishori Pednekar trolled on social media)

महापौर काय म्हणाल्या?

मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढला गेला असून जे नियमात बसतील त्यांच्याकडून लस घेऊ. मुंबईत लसीचा तुटवडा आहे म्हणून केंद्र बंद आहेत. केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांना लस दिली जाते पण पालिकेला मिळत नाही. केंद्राकडून आम्ही सुद्धा लस विकत घ्यायला तयार आहोत पण नागरिकांना मोफत लस देऊ. कॉर्पोरेट क्षेत्रात लस दिली जाते पालिका किंवा राज्य सरकारला मुबलक दिली जात नाही, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली होती.

संबंधित बातम्या :

Kishori Pednekar | मुंबईकरांच्या 1 कोटी लसींसाठी 9 कंपन्या! : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, महापौर किशोर पेडणेकर म्हणतात…

(Mumbai Mayor Kishori Pednekar trolled on social media for objectionable language on Twitter says Tujhya Bapala)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.