सिलिंडर स्फोट झाल्यानंतर मुंबईच्या महापौर कुठे होत्या ? भाजप नेते आशीष शेलारांचा सवाल

मुंबईः वरळीतील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तसेच बाळापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाला. मुंबईच्या महापौर मात्र 72 तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. यावर भाजप नेते आशीष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढा वेळ मुंबईच्या महापौर कुठे होत्या, […]

सिलिंडर स्फोट झाल्यानंतर मुंबईच्या महापौर कुठे होत्या ? भाजप नेते आशीष शेलारांचा सवाल
भाजप नेते आशीष शेलार
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 8:49 PM

मुंबईः वरळीतील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तसेच बाळापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाला. मुंबईच्या महापौर मात्र 72 तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. यावर भाजप नेते आशीष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढा वेळ मुंबईच्या महापौर कुठे होत्या, त्यांना या घटनेची जराही खबर नव्हती का, असा संतप्त सवाल आशीष शेलार यांनी केला.

नायर रुग्णालयातला प्रकार टाळकं फिरवणारा!

नायर रुग्णालयात पोहोचलेल्या जखमींना तब्बल 45 मिनिटे तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही की विचारपूस नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळकं फिरवणारा आहे. त्यामुळे जनतेच्या मनातलाच प्रश्न आम्ही विचारतोय की मुंबई महापालिकेत चाललंय काय? भाजप नेत्यांचा एक गट तिथे पोहोचला तेव्हा रुग्णालय प्रशासनातील हलगर्जीपणा समोर आला. तिथे ड्युटी अलॉटमेंट बुक नाही की आणखी काही नोंदी नाहीत. प्राणवायू निर्मिती प्रकल्प आहे, पण तो बिनकामी, असा आरोप शेलार यांनी केला.

महापौरच पोहोचल्या नाहीत, आमदर तर हवेतच!

वरळीतील बीडीडी चाळीत एवढी भीषण दुर्घटना घडली पण महापौरांनाच इथे यायला 72 तास उलटले. स्थायी समिती अध्यक्ष पोहोचले नाहीत. त्यामुळे वरळीतल्या स्थानिक आमदारांकडून काय अपेक्षा करणार? हे आमदार.. युवराज (आदित्य ठाकरे) तर हवेतच असतात, असा टोला आशीष शेलार यांनी लगावला.

पेंग्विनसाठी रोज दीड लाख रुपये, बाळासाठी 45 मिनिटेही नाहीत?

याच परिसरात असलेल्या राणीच्या बागेतील पेंग्विनवर दिवसाला दीड लाख रुपये खर्च होतात. वर्षाला या पेंग्विनवर 15-16 कोटी रुपये खर्च कराल. पण बाळाला वाचवण्यासाठी 45 मिनिटात पोहोचणार नाही, हा प्रश्न विचारला तर झोंबतो.  . या हलगर्जीपणाविरोधात आम्ही हल्लाबोल करणार.. अशी स्पष्टोक्ती आशीष शेलार यांनी केली.

इतर बातम्या-

कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित

खासदार आमदार टोल का देत नाहीत? नितीन गडकरी म्हणतात…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.