बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादी हैराण, आता पोस्टर लावणाऱ्याचा शोध सुरु

राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत बॅनर वॉरमुळे अडचणीत आला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर नेत्यांविरोधात बॅनर लावले जात आहे.

बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादी हैराण, आता पोस्टर लावणाऱ्याचा शोध सुरु
सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 12:38 PM

मुंबई : पुण्यातील पोटनिवडणुकीत बॅनर वॉर चांगलेच गाजले होते. कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले होते. बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच बॅनर लावणाऱ्यांचा शोध घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. भाजपविरोधातील हे बॅनर वॉर होते. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत बॅनर वॉरमुळे अडचणीत आला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर नेत्यांविरोधात बॅनर लावले जात आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर लावलेल्या या बॅनरचा सूत्रधार कोण? त्याचा शोध राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

काय आहे बॅनर

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर अज्ञाताकडून बॅनर लावण्याचा प्रकार सुरुच असल्याचं समोरं आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारा पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसांत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा देखील अशाच पद्धतीचा एक पोस्टर लावण्यात आला होता. विशेष म्हणजे हे पोस्टर लावणार्‍याचं नाव लिहिण्यात आलं नव्हतं.

आता सुप्रिया सुळेंचे बॅनर

अजित पवार यांचे बॅनर लावून दोन दिवस झाले. आता खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावले आहे. त्यात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे म्हटले गेले आहे. मात्र काहीचं वेळात हा पोस्टर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तत्काळ काढून टाकण्यात आला आहे.

या सगळ्या प्रकारावरून कोणीतरी हा प्रकार खोडसाळपणे करत असल्याचा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाचे म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणी लवकरच पक्ष कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.  मुंबईमध्ये  भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहे,  कुठे लागले पोस्टर मला माहीत नाहीत. मी पाहिले नाही. कुणाकडे फोटो आहेत ? फोटो मागवा नंतर मी उत्तर देईन…

पुण्यातील शोध अजूनही नाहीच

पिंपरी-चिंचवडमध्ये आणि आता पुणे शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. परंतु हे बॅनर कोणी लावले? हे स्पष्ट झाले नाही. यामुळे या बॅनरमागे आहेत तरी कोण? याचा शोध अजून लागला नाही. यामुळे मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात लावण्यात येणाऱ्या बॅनरच्या मागे कोण आहे, याचा शोध लागणार आहे का? आहे ही प्रश्न आहे.

कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना बॅनर लावणाऱ्यांचे शोध घेण्याचे काम करण्याची जबाबदारी आली आहे. यासंदर्भात सर्वसामान्य जनतेमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.