कसं शक्य आहे? मुंबईतल्या नाल्यांमधून महिलेचा मृतदेह हाजीअलीपर्यंत वाहत गेला

घाटकोपरमधून वाहिलेला मृतदेह हाजीअलीच्या समुद्रकिनारी वाहत गेला आणि....!

कसं शक्य आहे? मुंबईतल्या नाल्यांमधून महिलेचा मृतदेह हाजीअलीपर्यंत वाहत गेला
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 3:12 PM

मुंबई : घाटकोपरमधील असल्फा इथून एक महिला गटारातून वाहून गेल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, आज पहाटे 3 वाजता सदर महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपासातही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (mumbai news woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शितल भानुशाली ही 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना घडली होती. आज पहाटेच्या सुमारास शितलचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्र किनारी आढळला. असल्फा ते हाजीअली दरम्यान जवळपास 20 ते 22 किमीचं अंतर आहे. ऐवढ्या लांब नाल्यातून मृतदेह कसा वाहून गेला असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

तर मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या लांब अंतरापर्यंत जाणं शक्यच नाही असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकड़ून सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर, महापालिकेनं पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या आणि ग्रील्स लावल्या आहेत. त्यामुळे महिलेचा मृतदेह वाहून जाऊच शकत नाही असं पालिकेनं म्हटलं आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असल्फाच्या पुढे साकीनाका इथंही ग्रील्स लावल्या गेल्या आहेत. या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. त्यामुळे या भागातूनही महिलेचा मृतदेह वाहू शकत नाही. असल्फा इथली वाहिनी ही माहिम इथं मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम इथं जाणं अपेक्षित आहे असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शितलचा नेमका अपघाती मृत्यू झाला की कोणी हत्या केली अशी शंका आता विचारली जात आहे. (mumbai news woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

तब्बल 20 ते 22 किमीचा प्रवास करून हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणी आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतायेत का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या चुकीमुळे महिलेचा अपघात की घातपात? असाही सवाल यावेळी उपस्थित होतो. या प्रकरणाची मुंबई महापालिका चौकशी करणार असून उपायुक्तांना 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले आहेत.

इतर बातम्या – 

दिवाळीपूर्वीच ग्राहकांची दिवाळी, सोनं 6 हजारांनी स्वस्त

नेहा कक्करचा होणारा नवरा आधी होता दुसऱ्या मुलीच्या प्रेमात, पण…!

(mumbai news woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.