राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी

भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन काही दिवसांपूर्वी आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन आला आहे.

राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 10:12 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे नेते (BJP) नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन  मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी लागलीच फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. त्यावेळी हा फोन पुणे शहरातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

धमक्यांचे सत्र

हे सुद्धा वाचा

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर येथे असणाऱ्या गडकरींच्या कार्यालयात तीन वेळा धमकी देणारे कॉल आले होते. हे धमकीचे फोन बेळगावच्या जेलमधून करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने हा फोन करण्यात आला. इतकेच नाही तर त्यावर तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली होती.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन आला आहे. हा फोन मुंबई पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला आहे. फोन करणाऱ्याने फक्त मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकणार असल्याचे म्हणत फोन कट केला. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कौटुंबिक वादातून कॉल

आरोपीने मद्य प्राशन करून नशेत फोन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपीची बायको पुणे येथील धायरी येथे वास्तव्यास आहे.  कौटुंबिक वादातून त्याने हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. मारुती आगवणे असं आरोपीचे नाव आहे. २ वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला असून मुलबाळ नाही. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक फोन केल्यावर सांगत आहेत.

पोलीस यंत्रणा अलर्ट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी त्वरीत फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. यावेळी फोन पुणे येथील वारजे येथून आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांना त्वरित तपास करण्याचे आदेश दिले.

अंबानी, अमिताभ बच्चन यांनाही धमकी

निनावी फोन करुन धमक्या देण्याचे सत्र वाढले आहे. राजकीय नेते, उद्योपती यांचा नावांचा वापर करत धमक्या दिल्या जात आहेत. यापूर्वी नागपूर पोलिसांना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांचा अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. यामुळे निनावी फोन पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.