Mumbai Rains Maharashtra Weather : पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठे कुठे ‘बरसात’?

राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या तीन ते चार दिवस असेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Mumbai Rains Maharashtra Weather :  पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठे कुठे 'बरसात'?
Rain Update
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 10:06 AM

मुंबई :  राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या तीन ते चार दिवस असेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 9 सप्टेेंबरपर्यंत राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा काल पुन्हा IMD ने दिला आहे. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 आणि 8 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र तीव्रता जास्त असेल. सोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे सातारा, रत्नागिरी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. रविवार राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढचे तीन दिवस पावसाची परिस्थिती कशी असणार?

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 7 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

8 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या काळात किनारपट्टीवरच्या मच्छीमारांना सावधानगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 3 दिवस देखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने उत्तर मराठवाड्यात 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर बीडमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात येत्या 4 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

(Mumbai Rain Maharashtra Weather update Todays Rain Some District orange and yellow Alert)

हे ही वाचा :

Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.