मुंबईत धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. (Mumbai rain only 16 percent water remaining in dam)

मुंबईत धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबई धरण (फोटो प्रातनिधिक)
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 2:13 PM

मुंबई : जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai rain only 16 percent water remaining in dam)

मुंबईत धरण क्षेत्रात तुरळक पाऊस, पाणीसाठा कमी 

मुंबईत पावसाने विश्रांती घेतलेली असून धरण क्षेत्रातही अगदीच तुरळक पाऊस पडतो आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. मात्र त्यात दररोज थोडीथोडी वाढ होते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे ही समाधानाची बाब आहे. सगळ्या तलावांत मिळून 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. धरणातील पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल या पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला तर मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

दररोज मुंबईला 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतो. या सातही धरणांत मिळून रविवारपर्यंत केवळ 2 लाख 41 हजार 97 दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाच्या साठवण क्षमतेच्या केवळ 16.66 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला संपूर्ण वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असावे लागतात.

पाण्याचा व्यावसायिक वापर कमी

मुंबईत सध्या तरण तलाव, उपहारगृहे, कंपन्या, कार्यालये बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा व्यावसायिक वापर कमी असला तरी घरोघरी स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. पाणी कपात टळण्यासाठी सर्व धरणे 100 टक्के भरणे आवश्यक आहे. शनिवारी धरण क्षेत्रात अगदीत 6 ते 8 मिमी इतका नगण्य पाऊस पडला.

धरण –          पूर्ण पातळी – आजची पातळी – आतापर्यंत पाऊस

उध्र्व वैतरणा – ६०३.५१ मीटर – ५९२.६३ मीटर – ३३७.०० मिमी

मोडकसागर – १६३.१५ मीटर – १५२.५६ मीटर – ५०५.०० मिमी

तानसा –        १२८.६३ मीटर – १२२.५१ मीटर – ५१२.०० मिमी

मध्य वैतरणा – २८५.०० मीटर – २४३.१० मीटर – ३६३.०० मिमी

भातसा – १४२.०७ मीटर – ११२.०९ मीटर – ४२९.०० मिमी

विहार – ८०.१२ मीटर – ७८.०७ मीटर – ९५३.०० मिमी

तुळशी – १३९.१७ मीटर – १३७.५१ मीटर – १४५९.०० मिमी

एकूण पाणीसाठा

२७ जून २०२१- २ लाख ४१ हजार ९७ दशलक्ष लीटर

२७ जून २०२०- १ लाख ३२ हजार ३५७ दशलक्ष लीटर

२७ जून २०१९ – ७१ हजार ५७४ दशलक्ष लीटर

(Mumbai rain only 16 percent water remaining in dam)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि…

Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.