AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे (Mumbai Rain Update).

Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा
| Updated on: Jul 03, 2020 | 11:25 AM
Share

मुंबई :  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे (Mumbai Rain Update). हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांची उंची 4.41 मीटर इतकी आहे (Mumbai Rain Update).

मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आतापासूनच ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

घरातच थांबा, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

महाराष्ट्रात जून महिन्यात पाऊस दाखल झाला. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडलेला नाही. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तास मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : PM Modi in Leh | पंतप्रधान मोदी अचानक लेह-लडाखमध्ये, कुणालाही कानोकान खबर नाही

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.