मुंबईवर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व, शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागांवर कोरलं नाव

मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचंच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईवर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व, शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागांवर कोरलं नाव
मुंबईवर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व, शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागांवर कोरलं नाव
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 11:00 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीआधी देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. या निवडणुकीनंतर राज्यात 26 जूनला विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये कोकण विभाग पदवीधर, मुंबई पदवीधर, मुबंई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. या चारही जागांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागांचा निकाल आता समोर आला आहे. या दोन्ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही शिलेदार या मतदारसंघात विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबई ही ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचं गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता आहे. पण आता शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर लोकसभा निवडणूक पार पडली. ठाकरेंनी मविकास आघाडीकडून आपल्या पक्षाचे 4 उमेदवार मुंबईतील लोकसभांच्या जागांवर उभे केले होते. या चार पैकी तीन जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर चौथे उमेदवार अमोत कीर्तिकर यांचा अतिशय कमी म्हणजे अवघ्या 48 मतांनी निसटता पराभव झाला. यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचंच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई शिक्षक मतदारसंघात अभ्यंकर यांचा 4 हजार 83 मते मितांनी विजयी

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय?

  1. ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :- 44 हजार 784 (विजयी)
  2. किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
  3. योगेश बालकदास गजभिये  :- 89
  4. ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
  5. ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- 11
  6. मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
  7. रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- 26
  8. ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37

महाराष्ट्रात नेमकी लढत कुणाकुणामध्ये?

  • कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस) – निरंजन डावखरे विजयी
  • मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट) – अनिल परब विजयी
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती) – ज. मो. अभ्यंकर विजयी
  • नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट)
Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.