मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी, कसारा घाट कसा केला पार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. घाट सेक्शन असल्याने येणाऱ्या रेल्वेस घाट चढण्यासाठी मागून बँकर लावावे लागतात.
मुंबई : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस 10 फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. त्याच दिवशी मुंबई- शिर्डी (Mumbai-Shirdi Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे. या रेल्वेचा लाभ शिर्डीला जाणाऱ्या सर्व मुंबईकरांना (Punekars) मिळणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 10 फेब्रवारी रोजी करणार आहेत. त्यापुर्वी तिची चाचणी कसारा घाटाच घेण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. घाट सेक्शन असल्याने येणाऱ्या रेल्वेस घाट चढण्यासाठी मागून बँकर (इंजिन) लावावे लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसला बँकर न लावता घाट पार केला. बँकर न लावता यशस्वी चाचणी झाली.
दादर, ठाणे आणि नाशिकरोड थांबा
मुंबई ते शिर्डी (mumbai to shirdi vande bharat express) वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 6.15 ला सुटेल आणि शिर्डीला दुपारी 12.10 ला पोहोचेल. तसेच शिर्डीहून संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि 11 वाजून 18 मिनिटांनी CSMT ला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल.
रोज चाचणी होणार
10 तारखेपर्यंत रोज वंदे भारत एक्स्प्रेसच्या 2 ते 3 चाचणी फेऱ्या होणार आहे. 10 तारखेला ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शिर्डीसाठी सुटणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत ट्रेनला बघण्यासाठी नागरिकांनी इगतपुरी स्थानकावर गर्दी केली आहे.
मेक इन इंडिया ट्रेन
देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत.