मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु झाली असून ती 14 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. पदवीच्या पहिल्या वर्षाची गुणवत्ता यादी ही 17 ऑगस्टला लागेल. दुसरी मेरिट लिस्ट 25 ऑगस्ट तर तिसरी 30 ऑगस्टला जाहीर केली जाईल.
मुंबई : मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु केलीय. विद्यापीठानं त्याचं शेड्युल जाहीर केलंय. अनुदानित असो की विना अनुदानित, विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व नोंदणी बंधनकारक आहे. ही प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु झाली असून ती 14 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. पदवीच्या पहिल्या वर्षाची गुणवत्ता यादी ही 17 ऑगस्टला लागेल. दुसरी मेरिट लिस्ट 25 ऑगस्ट तर तिसरी 30 ऑगस्टला जाहीर केली जाईल. (Graduation process begins at Mumbai University)
ही नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या वेबसाईटवर करता येईल. विद्यार्थ्यांना सेल्फ अफेडेविट भरून कोणत्याही एका कॉलजमध्ये प्रवेश निश्चित करणं गरजेचं आहे. एकदा तो निश्चित झाला तर नंतर मुळ कागदपत्रं सादर करुन अंतिम प्रवेश दिला जाईल.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अशी असेल?
ऑनलाईन अर्ज विक्री- 5 ते 14 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंत
ऑनलाईन फॉर्म दाखल करण्याची तारीख
6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट इन हाऊस प्रवेश तसच अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशही याच कालावधीत केले जातील.
पहिली गुणवत्ता यादी
17 ऑगस्ट (स.11 वाजता)
ऑनलाईन कागदपत्र पडताळणी
18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, दुपारी 3 वा. पर्यंत
दुसरी गुणवत्ता यादी
25 ऑगस्ट, सायं. 7 वा.
ऑनलाईन कागदपत्र पडताळणी आणि फी भरणे
1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर
हे लक्षात ठेवा
>> विषयसमुहाप्रमाणेच विषय निवडणे बंधनकारक
>> प्रवेशपूर्ण ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्सेससाठी
>> नोंदणी अर्जाची प्रत काढून ठेवा, संबंधीत कॉलेजात प्रवेश करते वेळी कागदपत्रासह सादर करावी लागणार
>>विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या गुणपत्रिकेसह आवश्यक ती कागदपत्र सोबत ठेवावीत.
>> विषय अंतिम ठरवण्याचे अधिकार प्राचार्यांकडे आहेत
>> स्वायत्त महाविद्यालयातल्या प्रवेशाचे अधिकार हे त्या संस्थेनं ठरवलेल्या नियम आणि अटीनुसार असतील
>> प्रवेश घेते वेळेस विद्यार्थ्याकडे जर ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत नसेल तर संबंधीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही.
Video : tv9Podcast | Indian Hockey ला सोन्याचे दिवस आणणारे Major Dhyan Chand#tv9Podcast #IndianHockey #MajorDhyanChand pic.twitter.com/1eyhVjr512
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
संबंधित बातम्या :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया सुरु, 22 ऑगस्टला ऑनलाईन परीक्षा
पुण्यातील कॉलेजमध्ये मिशन अॅडमिशन, प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु
Graduation process begins at Mumbai University