AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power Cut | महापालिकेच्या रुग्णालयांवर परिणाम नाही; मुंबई महापालिकेचा दावा

खंडित विद्युत पुरवठ्याचा महापालिकेच्या रुग्णालयांवर कोणताही परिणाम झाला नाही, असे मुंबई महापालिकेने सांगितले आहे.

Mumbai Power Cut | महापालिकेच्या रुग्णालयांवर परिणाम नाही; मुंबई महापालिकेचा दावा
| Edited By: | Updated on: Oct 12, 2020 | 4:37 PM
Share

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील काही भागात विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने अनेकांचे हाल झाले. लोकल, सरकारी कार्यालयांवरही त्याचा परिणाम झाला. नायरसारखी मोठी रुग्णालयेसुद्धा यातून सुटली नाहीत. त्यामुळे खंडित विद्युत पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयांवर कोणताही परिणाम झाला नसून, पालिकेची सर्व रुग्णालये पर्यायी व्यवस्थेसह सज्ज असल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. (Municipal hospitals are not affected by Mumbai power off Claim Mumbai Municipal Corporation)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयांना सर्व सोयीसुविधांचा पुरवठा वेळेत व्हावा याची कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. त्यातच आज मुंबई, ठाण्याच्या काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सर्व सुविधांवर परिणाम झाला. लोकल, तसेच सरकारी, खासगी कार्यालयांची कामकाजं लाईट नसल्यामुळे रेंगाळली. तसेच काही रुग्णालयांतलाही विद्युत पुरवठा खंडित झाला. नायरसारखे मोठे रुग्णालयही यातून सुटले नाही. परिणामी वीज नसल्यामुळे रुग्णांच्या देखभालीवरही अनिष्ट परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. महापालिकेने रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा केलाय. महापालिकेने सांगितलं आहे की, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित होण्याची वारंवारिता अत्यंत कमी आहे. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते. अचानक काही अडचण आली, तर सर्व रुग्णालयांमध्ये डिझेल इंधनावर चालणारी स्वयंचलित जनरेटर रुग्णालयांत उपलब्ध असतात.

विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर जनरेटर सुरु

महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे की, रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर लगेचच सर्व जनरेटर स्वयंचलित पद्धतीने तत्काळ सुरू झाली. तसेच या अनुषंगाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या सर्व 24 विभागांमधील यंत्रणा तत्काळ सुरु करण्यात आल्या. तसेच घनकचरा व्यवस्थापन खात्याने संभाव्य गरज लक्षात घेऊन सर्व विभागांमध्ये डिझेलचा साठाही तत्काळ करुन घेतला. या सर्व उपाययोजनांमुळे महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील कामकाज अव्याहतपणे आणि सुरळीतपणे सुरु राहू शकले.

शासकीय तसेच खासगी कोव्हिड रुग्णालायांत डिझेलचा मुबलक साठा

महापालिकेच्या रुग्णालयांसह सर्व खाजगी कोव्हिड रुग्णालयांमध्येही डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती मनपाने दिली. तसेच जनरेटर व्यवस्थित सुरु आहेत किंवा नाही, याची माहितीही आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्याचबरोबर इतर खाजगी रुग्णालयांना काही अडचणी आल्यास, त्यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेने खासगी रुग्णालयांना केले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईचा वीज पुरवठा खंडित का झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Mumbai Power cut: मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला; तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

(Municipal hospitals are not affected by Mumbai power off Claim Mumbai Municipal Corporation)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.