भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष, मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले : नाना पटोले
भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष आहे. त्यांनी केवळ गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसेंचा वापर करुन डावलले, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं.
मुंबई : “पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे आणि मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत आहे. त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आहे. मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे. चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे. या महत्वाच्या प्रश्नांवर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे,” असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. ते टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
“भाजप बहुजन समाज विरोधी, लोकांचा वापर करुन नंतर बाजूला करतात”
नाना पटोले म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी आहे. या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करतात. याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले, झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते असा संशय येतो. भाजपा हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले आहे.”
प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले LIVE https://t.co/T2bc5RKx41
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 13, 2021
“अंटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या? याचा तपास का नाही?”
“मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहिम राबवली गेली. 100 कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक आहे. ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही. अंटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या? हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व स्क्रिप्टेड असून त्याप्रमाणेच होत आहे,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा :
झोटिंग समिती फास होता, खडसेंना केवळ त्रास होता, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते : नाना पटोले
नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; राऊतांचा सल्ला
शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये
व्हिडीओ पाहा :
Nana Patole allegations on BJP over OBC leadership and Politics