Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम; नाना पटोले यांचा आरोप

मुंबई व महाराष्ट्राला भाजप वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत आहेत. (nana patole slams bjp over sachin vaze issue)

गुजरातच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम; नाना पटोले यांचा आरोप
nana patole
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 6:07 PM

मुंबई: मुंबई व महाराष्ट्राला भाजप वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम राबविली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (nana patole slams bjp over sachin vaze issue)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नाना पटोले यांनी हा आरोप केला आहे. मुंबई पोलिस हे जगातील सर्वोत्तम पोलिस दलांपैकी एक असताना त्यांना खलनायक बनवले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांबद्दल जे विधान केले त्यावरून त्यांचा सर्वांकडून निषेध केला गेला. भाजपाकडून महाराष्ट्र पोलिसांचा केला जात असलेला अपमान काँग्रेस कदापी सहन करणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला.

डेलकर प्रयत्न दाबण्याचा डाव

पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या प्रकरणाआडून भारतीय जनता पार्टी खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, एनआयएचा ससेमिरा लावला जात असून हे काही नवीन नाही. ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला ही काँग्रेसची भूमिका असल्याने वाझे असो किंवा आणखी कुणी असो, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मोदी सरकार पाकधार्जिणे

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आटोक्यात आलेले कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नाही हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानधार्जिणे सरकार आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

कोरोना लसी पुरवण्यात दुजाभाव

केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारची वारंवार अडवणूक करत आहे. कोरोना संकट मोठे असताना पीपीई कीट, कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरवण्यासंदर्भातही अडथळे आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीतही कोरोनावर मात करण्यात मोठे यश मिळवले. परंतु पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा कार्यक्रमही राबविला जात आहे. परंतु राज्याला आवश्यक असलेल्या प्रमाणात लस दिल्या जात नाहीत. लस पुरवण्यात केंद्र महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवत आहे याची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार, असल्याचं त्यांनी सांगितलं. (nana patole slams bjp over sachin vaze issue)

वीज बिलावर सकारात्मक निर्णय होणार

लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांसंदर्भात लोकांच्या मोठ्या तक्रारी आलेल्या होत्या. यातून लोकांना दिलासा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. घरगुती आणि कमर्शियल विद्युत बिलाबाबतच्या धोरणावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. ऊर्जा विभागाकडून त्यांनी अहवाल मागवला असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे, असंही त्यांनी सांगितलं. (nana patole slams bjp over sachin vaze issue)

संबंधित बातम्या:

त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर

…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार, निलेश राणे यांचा इशारा

शरद पवारांना संजय राऊत भेटले; या 5 मुद्यांवर चर्चा झाल्याची शक्यता!

(nana patole slams bjp over sachin vaze issue)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.