स्वातंत्र्यवीरांना अभिवादन नाही, मुख्यमंत्र्यांना सावरकर आणि हिंदुत्वाचा विसर; राणेंची टीका

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (narayan rane slams cm uddhav thackeray on savarkar issue)

स्वातंत्र्यवीरांना अभिवादन नाही, मुख्यमंत्र्यांना सावरकर आणि हिंदुत्वाचा विसर; राणेंची टीका
नारायण राणे, भाजप नेते
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 1:53 PM

मुंबई: भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काल शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सावरकरांना अभिवादन केलं नाही. सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. (narayan rane slams cm uddhav thackeray on savarkar issue)

नारायण राणे यांनी ट्विटरवरून ही टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरून आणि सीएमओ या ट्विटर हँडलवरूनही सावरकरांना अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी?, अशी टीका राणेंनी केली आहे.

शिवसेना आणि हिंदुत्वाचा संबंध नाही

दरम्यान, यापूर्वीही राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर हिंदुत्वावरून टीकास्त्र सोडलं होतं. ”शिवसेना आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. स्वाभिमान आणि अभिमान नसलेली आताची शिवसेना आहे. साहेबांच्या वेळेला वेगळी शिवसेना होती,” असं म्हणत राणेंनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत. उद्धव ठाकरे हे मातोश्रीचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली आहे. सातबाऱ्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला होता.

वन मंत्री संजय राठोड प्रकरणीही त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली होती. शिवसेनेच्या ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, सुशांतच्या केसमध्ये काय, दिशा सालियानच्या केसमध्ये काय? ती पण हत्या होती, पण आत्महत्या सांगण्यात आलीय, आताही तेच होतंय, असंही ते म्हणाले होते. हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्याला पाठबळ देतंय, ताकद देतंय. आम्ही दोघेही मुख्यमंत्री झालेलो आहोत. कुंपणच शेत खातंय. नवाब मलिकांना स्वप्न पडणार नाहीत, कारण ते त्या स्पर्धेत नाहीत. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, ते राजीनामा काय देणार?, अशी टीकाही त्यांनी केली होती. (narayan rane slams cm uddhav thackeray on savarkar issue)

संबंधित बातम्या:

Chitra Wagh | पवारसाहेब मला आज तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ

‘देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील’

तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का; नारायण राणे खुर्चीतून मागे वळून म्हणाले….

(narayan rane slams cm uddhav thackeray on savarkar issue)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.