उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’, नारायण राणे यांच्याकडूनही सर्वात खोचक उत्तर, शिवसेनेवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंनी 'भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?', असा खोचक सवाल केला होता. त्यांच्या याच टीकेला आता भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?', नारायण राणे यांच्याकडूनही सर्वात खोचक उत्तर, शिवसेनेवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 5:31 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली होती. यावेळी टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’, असा खोचक सवाल केला होता. त्यांच्या याच टीकेला आता भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“महाराष्ट्रात 85 टक्के पेक्षा जास्त साक्षरता आहे. उद्धव ठाकरे यांचं बुलढाण्यातील भाषण माझ्याकडे आहे. म्हणे, भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? आता चोर म्हणत आहेत”, असं नारायण राणे म्हणाले.

“त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर?”, असे प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.

हे सुद्धा वाचा

“तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा. कोरोनाचे औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते जरा सांगा. किती खोके, पेट्या औषधामध्ये गेल्या?”, असा सवाल करत राणेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय.

“माझ्याकडे कंपन्यांचा पुरावा आहे. मालक बोलायला तयार आहेत की, किती टक्के मागत होते. औषधांअभावी अनेक माणसं गेली. आणि हे टक्के मागत होते”, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.