नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद आता विधानभवनाच्या दारात; वसंतराव नाईकांचे नाव देण्यासाठी निदर्शने
नवी मुंबई विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलने सुरू असतानाच आता नवी मागणी पुढे आली आहे. (former chief minister vasantrao naik name)
मुंबई: नवी मुंबई विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलने सुरू असतानाच आता नवी मागणी पुढे आली आहे. वसंत विचारधारा मंचने नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आज वसंत विचारधारा मंचने विधानभवन परिसरात निदर्शनेही केली. (Navi Mumbai Airport Row: vasant vichar manch Demands To give former chief minister vasantrao naik name)
वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही निदर्शने करण्यात आली. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली वसंत विचारधारा मंचने आज विधानभवन परिसरात येऊन वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात यावं म्हणून हातात बॅनर्स घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी मंचचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव न दिल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
ही समाजाची मागणी
आम्ही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. विमानतळाला वसंतरावांचं नाव द्यावं ही समाजाची मागणी आहे. नवी मुंबई बसवण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे. ते हरितक्रांतीचे जनक आहेत. त्यामुळे त्यांचं योगदान लक्षात घेऊन सरकारने विमानतळाला त्यांचं नाव दिलं पाहिजे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली.
कुणाच्याही नावाला विरोध नाही
आमचा कुणाच्या नावाला विरोध नाही. या विमानतळाला वसंतरावांचं नाव द्यावं ही आमची मागणी आहे. सरकारने त्याचा निर्णय घ्यायचा आहे. वसंतरावांचा नवी मुंबईशी संबंध आहे. त्यांनी नवी मुंबई उभारली. त्यामुळे विमानतळाला त्यांचंच नाव दिलं पाहिजे, अशी मागणीही राठोड यांनी केली.
वाद काय?
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. तर स्थानिकांनी दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून स्थानिकांनी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे नामांतराचा वाद चिघळला असून त्यात आता या विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणी पुढे आल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. (Navi Mumbai Airport Row: vasant vichar manch Demands To give former chief minister vasantrao naik name)
VIDEO : नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद, विधानभवन परिसरात आंदोलन#NaviMumbai #NaviMumbaiAirport #VidhanSabha #Andolan pic.twitter.com/Vq27MqlTu5
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2021
संबंधित बातम्या:
बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी
(Navi Mumbai Airport Row: vasant vichar manch Demands To give former chief minister vasantrao naik name)