सुप्रीम कोर्टाची ईडी, सीबीआय कारवाईवर शंका; नवाब मलिक म्हणतात, याचा अर्थ सूडभावनेनेच कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून शंका व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. (nawab malik)

सुप्रीम कोर्टाची ईडी, सीबीआय कारवाईवर शंका; नवाब मलिक म्हणतात, याचा अर्थ सूडभावनेनेच कारवाई
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 6:47 PM

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून शंका व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (nawab malik slams bjp over supreme court remarks on ED)

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना ही टीका केली आहे. ईडी व सीबीआय यांचा देशातील तपास ज्या पध्दतीने सुरू आहे, त्यावर सुप्रीम कोर्टाने एकप्रकारे शंका निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही एजन्सींना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका घेतली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

ईडीवर राजकीय दबाव

ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित होते आहे. खडसे यांची संपत्ती जप्त करण्यात आली तर काहींना वारंवार बोलावून त्रास दिला जात आहे. अशा प्रकारे राजकीय दबावाने काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सर्वाधिक केसेस असलेले नेते भाजपचेच

ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत, असा पलटवारही त्यांन केला आहे. राज्यसरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला असून त्याला मलिक यांनी उत्तर दिले आहे.

गुजरातमध्ये दाऊदचा हस्तक मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्यापध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता. त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदी मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत, असा दावाही त्यांनी केला. भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत, याची आठवणही त्यांनी पाटील यांना करून दिली. (nawab malik slams bjp over supreme court remarks on ED)

संबंधित बातम्या:

अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

सांगू का आता पोलिसांना उचलायला, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे, कॅमेरामनवर अजित पवारांची टोलेबाजी

(nawab malik slams bjp over supreme court remarks on ED)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.